राज्यात सध्या दोन पक्षांमधल्या चार गटांमध्ये आपापसांत आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण रंगताना पाहायला मिळत आहे. एकीकडे अवघ्या आठवड्याभरापूर्वी फूट पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार आणि शरद पवार गट एकमेकांवर कुरघेडी करण्याचा प्रयत्न करत असताना दुसरीकडे वर्षभरापूर्वी फूट पडलेल्या शिवसेनेतील उद्धव ठाकरे गट व एकनाथ शिंदे गट यांच्यातील ससेमिरा अजूनही कायम आहे. रविवारी एकनाथ शिंदेंनी मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात उद्धव ठाकरेंना टोला लगावल्यानंतर आज उद्धव ठाकरेंनी अमरावतीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदेंना प्रत्युत्तर दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हणाले होते एकनाथ शिंदे?

शिंदे गट अल्पसंख्याक विभागाचा मेळावा रविवारी मुंबईतल्या षण्मुखानंद सभागृहात पार पडला. यावेळी बोलताना एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर खोचक टीका केली. “मला काहीही नशिबामुळे मिळाले नसून मी अतिशय मेहनत घेतो. नशिबाने एखादे वेळीच फळ मिळते. मी मुख्यमंत्री झाल्यामुळे अनेकजण घराबाहेर पडले. आता ते सगळीकडे फिरतायत”, असा टोला यावेळी एकनाथ शिंदेंनी लगावला.

उद्धव ठाकरेंचं खोचक प्रत्युत्तर!

दरम्यान, एकनाथ शिंदेंच्या या टीकेला सध्या विदर्भ दौऱ्यावर असणाऱ्या उद्धव ठाकरेंनी अमरावतीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत उत्तर दिलं. “त्यांचं असं म्हणणं असेल तर मी रुग्णालयात असताना रात्री हुडी घालून गुप्त बैठका कुणी घेतल्या? याचंही उत्तर त्यांनी द्यावं. मला हलताही येत नव्हतं हे खरं आहे. पण तेव्हा यांच्या हालचाली चालल्या होत्या. रात्रीच्या गाठीभेटी चालल्या होत्या. पूजाअर्चा चालल्या होत्या. त्याचं उत्तर त्यांनी द्यावं”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“काय अडचण आली होती डॅडा?” आमदार रोहित पवारांची भावनिक पोस्ट; सांगितला घरी घडलेला ‘तो’ प्रसंग!

“मला सामना चित्रपटाची आठवण झाली”

दरम्यान, सध्याच्या राजकीय परिस्थिती आपल्याला सामना चित्रपटाची आठवण झाल्याचा टोला उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना लगावला. “मला काल सामना चित्रपटाची आठवण आली. त्यात गाणं आहे, कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे. तशी परिस्थिती आत्ताच्या सरकारची आहे”, असं ते म्हणाले.

शिवसेना मुस्लिमांविरोधात नाही!, एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन; आम्ही मंदिरांबरोबरच मशिदीही वाचविल्या

“पूर्वी सरकार मतपेटीतून जन्माला यायचं, हल्ली सरकार खोक्यातून जन्माला येतंय. तुम्ही मतदान कुणालाही करा, सरकार माझंच येणार असा जर पायंडा पडला, तर उद्या कुणीही जो दमदाटी, पैशाचा खेळ करू शकतो, तो देशाचा पंतप्रधान किंवा राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो. शिवसेना प्रमुखांनी तेव्हा राईट टू रिकॉलची कल्पना मांडली होती. आता नोटा आलंय, तसंच मी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीनी चूक केली असेल, त्याला परत बोलवण्याचा अधिकार द्यायला हवा का, यावर देशात विचार करायला पाहिजे”, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray reaction on cm eknath shinde speech in mumbai pmw
Show comments