मराठा आरक्षण प्रकरणावरुन उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर खोचक शब्दांमध्ये टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस यांचं ज्ञान इतकं तोकडं असेल असं मला वाटलं नव्हतं असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. उद्धव ठाकरे हे जालन्याला गेले होते आणि त्यांचं भाषण मी ऐकलं, त्यांनी सांगितलं की याच्यावर लगेच वटहुकूम काढा. ५ मे २०२१ पासून एक वर्ष, एक महिना तुम्ही मुख्यमंत्री होतात तर मग यावर तुम्ही वटहुकूम का काढला नाहीत? असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते त्यावर उद्धव ठाकरेंनी हे उत्तर दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फडणवीसांचं ज्ञान एवढं तोकडं असेल असं मला वाटलं नव्हतं

देवेंद्र फडणवीसांचं ज्ञान एवढं तोकडं असेल मला वाटत नाही. कारण हा अधिकार केंद्राचा आहे. वटहुकूम सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधात राज्य सरकार काढायला लागलं तर मला वाटतं देवेंद्र फडणवीस हे मंत्रालयाच्या आसपासही फिरकण्याच्या कुवतीचे नाहीत. घटनेचा त्यांनी काहीही अभ्यास केलेला नाही असंच त्यातून सिद्ध होतं. घटना बदलण्याचं काम जे करणार आम्ही जे म्हणतोय त्याची सुरुवात आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीच्या बाबतीत ते करुन दाखवलं. निकाल फिरवला. आता खास अधिवेशन घेऊन वटहुकूम काढावा. जर देवेंद्र फडणवीसांना हे वाटत असेल की वटहुकूम का काढला नाही तर तुम्ही अधिवेशन घ्या आणि तुम्ही काढा वटहुकूम असं प्रति आव्हानही उद्धव ठाकरेंनी दिलं. या घटनेची जबाबदारी स्वीकारून गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. मुख्यमंत्र्यांचं पोलीस ऐकत नसतील तर त्यांनीही राजीनामा दिला पाहिजे अशीही मागणी उद्धव ठाकरेंनी केली.

हे पण वाचा- उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात ज्या ‘कलंक’ शब्दामुळे वाद रंगला आहे त्या शब्दाचा नेमका अर्थ काय?

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?

आरक्षणाचा कायदा २०१८ मध्ये आपण तयार केला. त्यानंतर माननीय उच्च न्यायालयाने तो कायदा मान्य केला. देशात आरक्षणाचे दोनच कायदे मान्य झाले आहेत एक तामिळनाडू आणि दुसरा महाराष्ट्र यांचा. सर्वोच्च न्यायालयातही हे प्रकरण वारंवार गेली. पण सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती देण्यास नकार दिला होता. मात्र सरकार बदलल्यानंतर २०२० मध्ये या कायद्यावर स्थगिती आली आणि २०२१ मध्ये तो कायदा रद्द झाला अशीही माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

हे पण वाचा- “काहींना माईक हातात आल्यावर…”, ‘त्या’ विधानांवरून अजित पवारांचा उद्धव ठाकरेंसह फडणवीसांवर निशाणा

उद्धव ठाकरे हे जालन्याला गेले होते आणि त्यांचं भाषण मी ऐकलं, त्यांनी सांगितलं की याच्यावर लगेच वटहुकूम काढा. ५ मे २०२१ पासून एक वर्ष, एक महिना तुम्ही मुख्यमंत्री होतात तर मग यावर तुम्ही वटहुकूम का काढला नाहीत? निव्वळ राजकारण करायचं हा सगळा उद्योग आहे. उद्धव ठाकरे जात होते तेव्हा राजेश टोपेंना काय सर्कस करावी लागली ते माहित आहे सगळ्यांना त्यावर मी बोलणार नाही. आमच्या काळात आम्ही ओबीसीच्या सगळ्या सवलती मराठा समाजाला दिल्या होत्या असंही फडणवीस यांनी म्हटलं होतं. त्याला आता उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray said i do not know that fadnavis knowledge on maratha reservation is very less scj
Show comments