Uddhav Thackeray : घाटकोपरमधील मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवबंधन बांधत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे. यावेळी उद्धव ठाकरेंनी मनोगत व्यक्त केलं. मी तुमच्या बरोबर खांद्याला खांदा लावून उभा असेन आणि तुम्हाला सहकार्य करेन असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. तसंच चोर दरोडेखोरांचं राज्य महाराष्ट्रावर आलं आहे अशीही टीका उद्धव ठाकरेंनी ( Uddhav Thackeray ) केली.

आपल्याला आता इतिहास घडवायचा आहे

जे जिंकलेत त्यांच्याकडे जल्लोष नाही. कारण त्यांना त्यांच्या विजयावर विश्वासच बसत नाहीये. निवडणूक निकालानंतरही तुम्ही आला आहात, जिंकल्यावर सगळे येतात. ज्याला पराभवाची खंत असते तोच इतिहास घडवतो. आपल्याला इतिहास घडवायचा आहे. असं उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray )

Uddhav Thackery News
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचा सवाल, “पंतप्रधान मोदींनी महाकुंभात डुबकी मारली, पण गणपती विसर्जन करु देत नाही हेच तुमचं हिंदुत्व?”
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
Amit Thackeray on Ajit Pawar
Amit Thackeray: ‘स्वतःच्या मुलाला निवडून आणता आलं नाही’, अजित पवारांच्या टीकेला अमित ठाकरेंचं प्रत्युत्तर; म्हणाले, “हरलो तरी..”
Devendra Fadnavis to Inaugurate TJD Deccan Summit 2025
ठाकरे, पवारांचे आधीच ठरले होते, मुख्यमंत्री फडणवीस यांचे मोठे वक्तव्य !
News About Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : “उद्धव ठाकरे काळ्या जादूचे बादशहा, त्यांनी वर्षा बंगला सोडला तेव्हा…”, शिवसेनेच्या ‘या’ नेत्याची बोचरी टीका
raj thackeray urges writers to speak on political issues
सरकार कोणाचेही असो, बोलले पाहिजे! मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे साहित्यिकांना आवाहन
Uddhav Thackeray, Ahilyanagar, existence,
अहिल्यानगरमध्ये ठाकरे गटाला गळती, अस्तित्वाचा प्रश्न
Amol Mitkari Taunts Raj Thackeray
Raj Thackeray : “राज ठाकरेंनी त्यांच्या सुपुत्राचा पराभव का झाला आणि मनसेचा…”, राष्ट्रवादीच्या नेत्याचा टोला

पक्ष काढण्यासाठी काहीतरी हेतू लागतो, राज ठाकरेंना टोला

यांनी (भाजपा) संपूर्ण मुंबई बरबटून टाकली आहे म्हणत आहेत एक है तो सेफ है. आता हाच प्रश्न मला मराठी माणसाला विचारायचा आहे. उद्याची मुंबई आपली राहणार आहे का? कारण असे बरेच गृहनिर्माण प्रकल्प आहेत जिथे आपली हक्काची मुंबई आपल्या डोळ्यांदेखत ओरबाडून नेली जाते आहे आणि अशा वेळी आपण षंढ म्हणून हे बघत बसणार का? तुम्ही कुठल्या पक्षातून आलात त्याबद्दल मला काही बोलायचं नाही. पण पक्ष स्थापन केल्यानंतर एक काहीतरी हेतू लागतो, दिशा लागते. ती अजिबातच त्या पक्षात (मनसे) नाही. अशावेळी तुमच्यासारखे कार्यकर्ते तिथे मरमर मेहनत करतात, त्या मेहनतीला काही अर्थ राहात नाही. आज तुम्ही सगळे शिवसेनेत आला आहात, होय शिवसेनाच कारण मी शिवसेना एकच मानतो. शिवसेना हे नाव इतर कुणालाही देण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही हे मी अनेकदा उघडपणे सांगितलं आहे आजही तेच सांगतो आहे. फक्त आपली निशाणी बदलली आहे असं उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) म्हणाले. आपल्या छोट्याश्या मनोगतात त्यांनी राज ठाकरेंनाही टोला लगावला आणि भाजपावरही टीका केली.

हे पण वाचा- “तू राहशील किंवा मी राहीन”, उद्धव ठाकरेंच्या आव्हानावर फडणवीसांचं संयमी उत्तर ऐकून शिवसेनेची सारवासारव

जनतेच्या मनातला मुख्यमंत्री मीच होतो मग..

आपली निशाणी बदलली तरीही मी महाराष्ट्रात जेव्हा फिरत होतो तेव्हा सगळे मला म्हणत होते उद्धवजी ( Uddhav Thackeray ) तुम्हीच येणार. मला गंमत वाटते की जे काही सर्व्हे चालले होते त्यात जनतेच्या मनतला मुख्यमंत्री कोण होता? मीच होतो. मग त्याची दांडी कशी उडाली? कारण हे सगळं चोरांचं आणि दरोडेखोरांचं राज्य आहे. हे राज्य आता आपल्याला उलथवून टाकावं लागेल. एक ठिणगी तर पडली आहे. मागच्या रविवारी मी बाबा आढाव यांच्या उपोषण स्थळी गेलो होतो, आता तुम्हाला झोपून चालणार नाही. हा मुंबईच्या मराठी माणसाचा आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा, अस्तित्त्वाचा प्रश्न आहे. योग्यवेळी तुम्ही मशाल हाती घेतली आहे, शिवसेनेचा भगावा हाती घेतला आहे. आता तुमचे जे काही प्रश्न आहेत, जिथे तुम्हाला मदत लागेल तिथे तुमच्या बरोबर मी तुमच्या खांद्याला खांदा लावून उभा असेन एवढी ग्वाही देतो असं उद्धव ठाकरेंनी ( Uddhav Thackeray ) म्हटलं आहे. आता यावर भाजपाकडून किंवा राज ठाकरेंकडून काही उत्तर दिलं जाणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Story img Loader