Uddhav Thackeray : “आनंद दिघे असते तर त्यांनी शिंदेला गोळीच घातली असती..”; उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?

एकनाथ शिंदे यांच्यावर उद्धव ठाकरेंची जोरदार टीका, आनंद दिघेंचं नाव घेत केला त्या घटनेचा उल्लेख.

What Uddhav Thackeray Said?
दसरा मेळाव्यातील भाषणात उद्धव ठाकरे यांनी नेमकं काय म्हटलं आहे? (फोटो-प्राजक्ता राणे, ग्राफिक्स टीम लोकसत्ता)

Uddhav Thackeray जर एकजुटीने बरोबर राहिलात आपलं सरकार आणणार आहोत अशी गर्जना आज उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यात केली. तसंच एकनाथ शिंदेंवर त्यांनी जोरदार टीका केली. अक्षय शिंदे या बदलापूर बलात्कार प्रकरणातील आरोपीच्या एन्काऊंटरचा उल्लेखही त्यांनी त्यांच्या भाषणात केला. तसंच आनंद दिघेंचं नाव घेत उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray ) एकनाथ शिंदेंना लक्ष्य केलं.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

“एकीकडे अब्दाली सारखी माणसं आहेत. पण त्यांना कल्पना नाही की ही शिवसेना आहे. जनता ही वाघनखं आहेत. सगळं ओरबाडून घेतल्यानंतरही जनता आई जगदंबेप्रमाणे माझ्याबरोबर राहिली आहे. त्यामुळे मला दिल्लीश्वरांची पर्वा नाही. अब्दालींसारख्यांची कितीही आक्रमण होऊदेत त्यांच्या छातीत भगवा गाडून मी उभा राहण्याची माझी तयारी आहे. इथला शिवसैनिक मशाल बनवून सरकारला चूड लावल्याशिवाय राहणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले. तसंच अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray ) एकनाथ शिंदेंवरही टीका केली.

एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका

ना सांगा बाळासाहेबांचा विचार हा तुझा विचार नाही. हिंदुत्व आमचा श्वास, मराठी आमचा प्राण अशी जाहिरात मिंध्यांनी दिली आहे. त्याला सांगा पुढच्या दोन ओळी राहिल्या. हिंदुत्व आमचा श्वास, मराठी आमचा प्राण, अदाणी आमची जान आणि आम्ही शेठजींचे श्वान या ओळी राहिल्या. हे सगळे शेपूट हलवणारे आहेत. मी कुत्र्यांचा अपमान करणार नाही. आपण टाटांचंही श्वान प्रेम पाहिलं मी देखील कुत्र्यांवर प्रेम करतो. मी श्वानप्रेमी आहे, पण मी लांडगा प्रेमी नाही. हे सगळे लांडगे आहेत. वाघाचं कातडं पांघरण्याचा प्रयत्न करत आहेत. पण चाललं आहे असं उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) म्हणाले.

हे पण वाचा- Uddhav Thackeray : “अदाणी आमची जान, आम्ही शेठजींचे श्वान या ओळी एकनाथ शिंदेंनी…”; उद्धव ठाकरेंची दसरा मेळाव्यातून बोचरी टीका

तर शिंदेला आनंद दिघेंनी गोळ्या घातल्या असत्या

लगेच काहीतरी देवाभाऊ वगैरे सुरु होतं. एरवी सगळं खाऊ असं असतं. ठाणे जिल्ह्यात शिंदेला गोळी घातली, शिंदेला गोळ्या घालायलाच पाहिजे होत्या. आज आनंद दिघे असते तर शिंदेला या पापाबद्दल गोळी घातलीच असती. आनंद दिघेंनी सर्वात पहिली शिंदेला गोळी घातली असती. असा हा नराधम, महिलेवर अत्याचार करतो, आईवर वार करतो. असा नराधम जगायचा लायकीचा नाही. त्यामुळे शिंदेला गोळी घातली बरंच झालं. शिंदेला गोळी घातल्याचं दुःख नाही. पण शिंदेला मारल्यानंतर जसं आपल्या मराठीत म्हणतात म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावतो. शिंदेला गोळी का घातली? कारण तुमचे बाकीचे सगळे होते त्यांना वाचवण्यासाठी तुम्ही शिंदेला गोळी घातली असेल त्याचा उलगडा झाला पाहिजे. तरीही आनंद दिघेंनी शिंदेला गोळी घातलीच असती. महिलांवर अत्याचार करणारे शिंदे जगायच्या लायकीचे नाही. असं उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray ) म्हटलं आहे.

रोज महाराष्ट्र लुटला जातो आहे

रोज माझा महाराष्ट्र लुटला जातो आहे. निर्मला सीतारमण म्हणाल्या होत्या देशात चारच जाती आहेत. गरीब, शेतकरी आणि काय तरी त्यांनी सांगितलं, कुणासाठी काम केलंत ते सांगा? या सरकारने राज्याची आणि मुंबई महापालिकेची तिजोरी रिकामी केली. मला एक माणूस दाखवा यांच्या मित्रांखेरीज की जो समाधानी आहे. ही निवडणूक फक्त उद्धव ठाकरेंची नाही. चंद्रचूड म्हणाले ना की इतिहासात माझी काय दखल घेतली जाईल? जर इतिहासात तुम्हाला तुमचं नाव अभिमानाने घेतलं जावं असं वाटत असेल तर लोकशाही वाचवा असंही आवाहान उद्धव ठाकरेंनी केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Uddhav thackeray said if anand dighe was alive today he would have shot shinde scj

First published on: 12-10-2024 at 21:11 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा
Show comments