Uddhav Thackeray : भाजपाचा वर्धापन दिन तिथीप्रमाणे, तारखेप्रमाणे की सोयीप्रमाणे आहे? अशी खोचक टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. रामनवमी हा तुमच्या पक्षाचा जन्मदिवस असेल तर प्रभू रामचंद्र वागले असतील तसं वागण्याचा प्रयत्न करा एवढ्याच माझ्या शुभेच्छा आहेत. असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

प्रभू रामाच्या पावलावर पाऊल ठेवून भाजपाने चालावं-उद्धव ठाकरे

रामनवमी असल्याने वर्धापन दिन भाजपा साजरा करते आहे का? रामाच्या पावलावर पाऊल ठेवून चाला असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. एसंशिच्या आरोपांवर मला काही बोलायचं नाही असंही उद्धव ठाकरे म्हणाले, पुढे बोला. वक्फ बोर्डाच्या विधेयकाबाबत जर काँग्रेसला कोर्टात जायचं असेल तर ठीक आहे आम्ही (शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे) कोर्टात जाणार नाही. असंही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे.

प्राण जाये पर वचन न जाए हे भाजपाला सांगण्याची गरज-उद्धव ठाकरे

भाजपाला शुभेच्छा देताना मी पुन्हा सांगतोय प्रभू रामाप्रमाणे वागा. निवडणूक जिंकण्यासाठी लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवू सांगितलं होतं, शेतकऱ्यांना कर्जमाफी होईल सांगितलं होतं, प्राण जाये पर वचन न जाए हे सांगण्याची गरज आहे. भाजपाने लोकांना फसवून मतं घेतली आहेत. रामाचं नाव घेण्याची या लोकांची पात्रता नाही असं मला वाटतं. माणिकराव कोकाटे यांच्यावर फसवणुकीचा आरोप आहे. कोर्टाने त्यांना आश्चर्यकाररित्या सोडवलं आहे असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

राज ठाकरेंबाबतचा प्रश्न टाळत दिलं असं उत्तर

मराठी बाबत आमची भूमिका स्पष्ट आहे. चला मराठी शिकू या असा उपक्रम आम्ही सुरु केला आहे. ज्यांना राहायचं आहे त्यांनी याचा लाभ घ्यावा. उत्तर भारतीयांना मराठी शिकवण्यासाठीचा हा उपक्रम आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंवर बोलणं टाळलं. भाजपाला फक्त जमीन, मालमत्ता आणि व्यापार इतकंच करणं भाजपाचं काम आहे. वक्फची जमीन घ्यायची मित्रांना द्यायची, ख्रिश्चन लोकांची जमीन घ्यायची, जैन समाजाची जमीन घ्यायची आणि मित्रांना द्यायची हेच त्यांचं धोरण आहे. वक्फ बोर्ड आणि हिंदूंचा काही संबंध नाही यांना कुणाला कुणाबाबत बोलण्याचा अधिकार नाही. ऑर्गनायजरने यांचा छुपा अजेंडा बाहेर आणला असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

हिंदू, जैन, बौद्ध यांच्याही जमिनी भाजपा घेणार-उद्धव ठाकरे

वक्फ बोर्डाच्या जमिनी घेणार आणि मित्रांना देणार, पुढची पायरी ख्रिश्चन कमिटीकडे असेल. जैन बांधव, हिंदू देवस्थानं यांच्या जमिनीही हे लोक घेतील हे मी आधीच बोललो होतो. कोणत्याही समाजाबाबत यांना प्रेम नाही. यांचं प्रेम फक्त मित्रांपुरतं आहे. आमचा याचमुळे वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाला विरोध केला आहे. तसंच आमची भूमिका आम्ही मांडली आहे. ऑर्गनायजरच्या लेखामुळे सगळ्यांचे डोळे उघडले पाहिजेत असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. लोकांना तणावग्रस्त आयुष्यात जगायला लावायचं हे यांचं धोरण आहे.