Uddhav Thackeray : देशाचं संसदेचं अधिवेशन सुरु आहे. तर महाराष्ट्रातलं अधिवेशन झालं. गेले काही दिवस कसं कामकाज सुरळीत चाललं आहे आपण बघतो आहे. विरोधक चांगले प्रश्न मांडत आहेत आणि सत्ताधारी उत्तर देत आहेत असं चित्र आहे असं म्हणतात. पण ही वस्तुस्थिती नाही. हिंदुत्वाचा विषय घेतला जातो आहे. बांगला देशात हिंदूंवर अत्याचार होत आहेत. अन्याय होतो आहे. दोन ते तीन महिन्यांपूर्वी बांगलादेशचा क्रिकेट संघही आला होता तेव्हा आदित्यनेही सांगितलं होतं अशा देशाबरोबर खेळायला नको. सरकारने मात्र काहीही केलं नाही. गप्प राहिलं असं उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) म्हणाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत आहेत मोदी गप्प का?

बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत आहेत. इस्कॉनचं मंदिर जाळण्यात आलं. त्यांच्या प्रमुखांना अटक झाली तरीही गप्प आहोत. हिंदूंवर अत्याचार होऊनही गप्प आहोत. माझी तमाम हिंदूंतर्फे पंतप्रधान मोदींना विनंती आहे की जसं आपण एका फोनवर युक्रेनचं युद्ध थांबवलं होतं तसंच बांगलादेशात जे काही हिंदूंवर अत्याचार होत आहेत त्याबद्दल भूमिका घ्यायला पाहिजे. नुसतं इथे बटेंगे, कटेंगे, फटेंगे वगैरे करुन उपयोग नाही. जिथे काही नाही तिथे छाती फुगवून दाखवू नका. जिथे अत्याचार होत आहेत त्यांना धमक दाखवण्याची गरज आहे असंही उद्धव ठाकरेंनी ( Uddhav Thackeray ) म्हटलं आहे.

मोदींना आमच्या खासदारांना भेटायला वेळ नाही

आमच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीची वेळ मागितली होती पण त्यांना ती नाकारण्यात आली. मी सांगितलं होतं की रितसर जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र द्यावं. कारण त्यांच्यामागे खूप व्याप आहेत. जगभरात फिरायचं असतं, भाषणं द्यायची असतात. त्यामुळे बांगलादेशातील हिंदूंवर होणारे अत्याचार त्यांच्या लक्षात आले नसतील. मणिपूरचे अन्याय कळले नाहीत तसंच हिंदूंवरचे अत्याचार कळले नसतील. त्यामुळे केंद्र सरकारने काय भूमिका आहे ते स्पष्ट केलं पाहिजे. शेख हसीना इथे आल्या त्या सुरक्षित आहेत. मात्र बांगलादेशातील गोरगरिब हिंदूंचं काय? हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं पाहिजे. बांगलादेशातील इस्कॉनचं मंदिर जाळलं तर सिडकोचा डोळा मंदिराच्या जागेवर अशी बातमी मी वाचली आहे. हा भूखंड एकालाच जाणार आहे. दुसरी एक बातमी आहे हनुमानाचं दादर येथील मंदिर आहे त्याला भाजपाने नोटीस पाठवली आहे. ८० वर्षांपूर्वींचं मंदिर पाडायला निघाले आहेत यांचं हिंदुत्व कुठे आहे? असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी ( Uddhav Thackeray ) विचारला आहे.

हिंदू म्हणजे फक्त मतं नाहीत-उद्धव ठाकरे

हिंदू म्हणजे फक्त मतं नाही, वन नेशन वन इलेक्शन हे सगळं नंतर पाहता येईल. मात्र मतांपुरतंच भाजपाचं हिंदुत्व शिल्लक उरलं आहे का? असा सवालही उद्धव ठाकरेंनी केला आहे. हिंदूंना भयभीत करायचं आणि त्यांची मतं घ्यायची. आता मंदिरं सेफ नाहीत मग कुठे गेलं यांचं हिंदुत्व असाही सवाल उद्धव ठाकरेंनी ( Uddhav Thackeray ) केला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray said why pm narendra modi is silent over bangladesh hindu injustice scj