मराठा मोर्चा संदर्भातील व्यंगचित्र प्रकरण

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मराठा क्रांतीमोर्चा संदर्भातील ‘सामना’मधील व्यंगचित्राबाबत न्यायप्रविष्ट प्रकरणी तारखेस हजर न राहिल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख, ‘सामना’चे संपादक उद्धव ठाकरे, कार्यकारी संपादक खासदार संजय राऊत, मुद्रक व प्रकाशक राजेंद्र भागवत व व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभूदेसाई यांच्यावर पुसद प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांनी समन्स बजावले.

अडीच वर्षांपूर्वी राज्यभर निघालेल्या मराठा क्रांती मोर्चास व्यंगचित्रात ‘मूका मोर्चा’ असे संबोधून मराठा समाजाची अवहेलना केल्याची तक्रार पुसदचे अ‍ॅड. दत्ता सूर्यवंशी यांनी दाखल केली होती. यासंदर्भात वरील चौघांना २२ एप्रिल रोजी पुसद न्यायालयात हजर होण्याचे समन्स बजावले होते. मात्र, ते हजर न झाल्याने प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी अनंत बाजड  यांनी त्यांच्यावर समन्स बजावले. व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभूदेसाई यांच्याविरुद्धही समन्स बजावले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray sanjay raut and others court orders summons