शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना संघर्षासाठी तयार राहा असं आवाहन करताना गरज पडल्यास महाविकास आघाडीमधील मित्रपक्षांसोबत निवडणूक लढणार असल्याची घोषणा केली. या घोषणेवर आता बंडखोर शिंदे गटाने पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. शिवसेनेचे बंडखोर आमदारांचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यावरुन प्रश्न विचारण्यात आला असता थेट उत्तर देणं टाळताना आपण एक साधे कार्यकर्ते असल्याचं म्हटलंय.

नक्की पाहा >> Photos: ‘फडणवीसांच्या पत्नीनेच…’, ‘कागद लिहून…’, ‘गुजरात, गुवाहाटी, गोव्यात…’, ‘फोडाफोडी करून जे..’; पवारांची फटकेबाजी

काल (१५ जुलै) शिवसैनिकांसमोर बोलताना उद्धव ठाकरेंनी गरज पडली तर पुन्हा शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र निवडणुका लढवतील आणि शिंदे गटातील आमदारांना विधानसभेमध्ये जाण्यापासून रोखतील. गरज पडल्यास महापालिका आणि नगरपालिका निवडणुकींसाठीही एकत्र लढू असं ते म्हणाले. कार्यकर्त्यांनी यासाठी तयार रहावं असं सांगण्यात आलं आहे, यावर आपलं काय मत आहे असं सांगत प्रश्न विचारण्यात आला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नक्की वाचा >> त्या ४० जणांना मनसेमध्ये सामावून घेण्यासाठी राज-फडणवीस भेट? NCP ने शंका उपस्थित करत म्हटलं, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या…”

“पक्षप्रमुख जे बोलतात त्याविरोधात बोलणं हे माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला शोभणारं नाहीय. मात्र एक गोष्ट मी कायम सांगू इच्छितो की आम्ही बाळासाहेबांची विचारसरणी मानणारे आहोत. बाळासाहेबांनी सांगितलं होतं की मी शेवटचा व्यक्ती असेल तरी काँग्रेसशी जुळवून घेणार नाही. काँग्रेससोबत कधीच जाणार नाही. मी माझी विचारधार पुढे घेऊन जाईल. मी भगवा झेंडा घेऊनच वाटलाच करेन, असं ते म्हणाले होते. आम्ही त्यांच्याच विचारांवर चालतोय. पक्षप्रमुख फार मोठे आहेत. ते काहीही बोलू शकतात. मात्र ती बाळासाहेबांची विचारसणी आहे की नाही यावर मी भाष्य करु शकतो. मी पक्षप्रमुखांच्या वक्तव्याविरोधात बोलू इच्छित नाही,” असं केसरकर म्हणाले.

नक्की वाचा >> …अन् देवेंद्र फडणवीस हसून म्हणाले, “…म्हणून आज दोन माईक ठेवलेत आणि कुठलीही चिठ्ठी नाही”; सभागृहात पिकला एकच हशा

“आम्ही आधीपासूनच सांगतोय की आम्ही बाळासाहेबांच्या विचारांवर चालतोय. मोदींच्या नेतृत्वाचं कौतुक जगभरामध्ये होतंय. त्यामुळे त्यांचाही आशिर्वादही या सरकारला आहे. महाराष्ट्राला पुढे घेऊन जायचं आहे. मी काही विरोधी वक्तव्य केलं तर पक्षप्रमुखांनाही वाईट वाटेल. माझ्यावर प्रेम करणारा कार्यकर्ता असं कसं बोलला असं त्यांना वाटू शकतं. मी उद्धव ठाकरेंच्या मार्गदर्शनाखावी जेवढं काम केलंय त्याहून अधिक काम पवारांच्या मार्गदर्शनाखाली केलंय. मी हे त्यांच्यावर टीका करण्यासाठी बोलत नाही. मला त्यांच्याबद्दल फार आदर आणि प्रेम आहे,” असं केसरकर म्हणाले.

नक्की पाहा >> Photos: दिल्लीतही शिंदे गट? भाजपा अजून एका ‘मास्टरस्ट्रोक’च्या तयारीत; केसरकर म्हणाले “…तेव्हा उद्धव ठाकरेसुद्धा ऐकतील”

“एकदा (शरद पवार) मुख्यमंत्र्यांसोबत डिनरला भेटले होते, तेव्हा कोकणासाठी राजकारण बाजूला ठेवून एकत्र काम केलं पाहिजे, असं म्हणाले होते. आपण त्यांच्या पक्षाच्या धोरणांबद्दल बोलतो तेव्हा त्यांचं नाव घेणं अनिवार्य होतं, कारण ते पक्षाचे प्रमुख आहेत. त्यामुळेच मी असं ठरवलंय की पवारांशी संबंधी काही असेल तर त्यावर मी वक्तव्य करणार नाही. कारण मी जर त्यांना गुरुस्थानी मानत असेल तर मी त्यासाठी जाहीर माफी मागितली आहे. त्यांचं मन दुखावलं असेल तर मी स्वत: सिलव्हर ओकवरही जायला तयार आहे. कारण छोट्या कार्यकर्त्यांनी विनम्र राहिलं पाहिजे,” असं केसरकर म्हणाले.

नक्की वाचा >> “चांगला मुख्यमंत्री कसा असतो हे उद्धव ठाकरेंनी दाखवून दिलं पण बरोबर असणाऱ्या…”; केसरकरांनी काँग्रेस, राष्ट्रवादीवर फोडलं खापर

“नेते मंडळी ही कार्यकर्त्यांपेक्षा मोठी असतात. काही निर्णय ते परिस्थितीनुसार घेतात. त्यामुळे जेव्हा परिस्थिती सामान्य होते मात्र ते निर्णय इतिहासाचा भाग होतात. जसं २०१४ मध्ये राष्ट्रवादीने भाजपाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यामुळे शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर आली. खरं तर ते भाजपाच्या तुलनेनं बरोबरीत होते. असे काही निर्णय होतात तेव्हा आम्ही त्या निर्णयांबद्दल बोलतो व्यकीबद्दल बोलत नाही,” असं केसरकर यांनी स्पष्ट केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray says if need will fight election in alliance with congress ncp eknath shinde rebel mla group first reaction scsg