सांगली : आघाडी धर्माचे पालन करत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे कार्यकर्ते मोठ्या आत्मविश्‍वासाने प्रचारात उतरल्याने उबाठा शिवसेनेला विजय निश्‍चित मिळणार असा विश्‍वास उमेदवार चंद्रहार पाटील यांनी सोमवारी विटा येथे व्यक्त केला.

महाआघाडी कार्यकर्त्यांचा मेळावा आज आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यास शिवसेनेचे संपर्क प्रमुख नितीन बानुगडे, जिल्हा प्रमुख संजय विभुते, उप जिल्हा प्रमुख शंभोराज काटकर उपस्थित होते. चरंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून शहरातून उमेदवार पाटील यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांनी पदयात्रा काढली. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाउ साठे यांच्या पुतळ्यालाही अभिवादन करून कलश मंगलकार्यालयात पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली.

संजय राऊतांच्या विधानाने युतीच्या चर्चेला बळ
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
BJP boycotts visit of Buldhana Guardian Minister and Rehabilitation Minister Makarand Patil
बुलढाणा : पालकमंत्र्यांच्या दौऱ्यावर भाजपचा बहिष्कार! युतीत विसंवाद
Delhi Assembly Elections BJP Third Manifesto
भाजपचा तिसरा जाहीरनामा; तीन वर्षांत यमुना स्वच्छ करण्याचे आश्वासन
bjp delhi marathi news
दिल्लीसाठी भाजप सज्ज; महाराष्ट्र, हरियाणाच्या धर्तीवर सूक्ष्म नियोजनावर भर
Uddhav Thackeray-Sharad Pawar meeting,
उद्धव ठाकरे-शरद पवार यांची भेट, महाविकास आघाडीची लवकरच बैठक होणार
Dhairyasheel Mohite Patil
Dhairyasheel Mohite Patil : “सवय बदला, अन्यथा मोजून आठवड्याच्या आत…”, खासदार धैर्यशील मोहिते पाटलांचा अधिकाऱ्यांना इशारा
MLA Rohit Pawar On NCP Sharad Pawar
Rohit Pawar : शरद पवार भाकरी फिरवणार? रोहित पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “आमच्या पक्षात फेरबदल…”

हेही वाचा…‘सगेसोयरे’ ज्यांना मान्य, त्यांच्या पाठीशी मराठा समाज; धाराशिव दौर्‍यात मनोज जरांगे-पाटील यांचे मत

या बैठकीत पैलवान पाटील यांनी माझ्या प्रचारात निर्माण झालेला संशय आता दूर झाला असून आमदार विश्‍वजित कदम, आ. अरूण लाड, क्रांती कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड ही मंडळी सहभागी झाली असल्याने महाविकास आघाडीला चांगले बळ मिळाले आहे. यावेळी देशपातळीवर परिवर्तन अटळ असल्याने कार्यकर्त्यांनीही या परिवर्तनामध्ये आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन त्यांनी केले.

हेही वाचा…“इंडिया आघाडीच्या हाती सत्ता गेल्यास पुन्हा भ्रष्टाचार, दहशतवाद अन् फाळणीचा धोका”, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इशारा

यावेळी भ्रमणध्वनीवरून आ. डॉ. कदम यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले, अचानक प्रकृर्ती बिघडल्याने मी या बैठकीस उपस्थित राहू शकत नसलो तरी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मविआ उमेदवाराच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. येत्या चार दिवसात परिस्थिती पूर्णपणे पालटलेली दिसेल. पैलवान पाटील हे खानापूर तालुययाचे सुपुत्र असून त्यांनी कुस्ती संकुल उभा करून पैलवानांना प्रोत्साहन देण्याचे चांगले काम हाती घेतले आहे. तसेच रक्तदानासारख्या समाजोपयोगी कार्यातही त्यांचे मोलाचे योगदान आहे असे सांगितले.

Story img Loader