एकनाथ शिंदेंच्या मनात उठावाचे बीज मीच पेरलं असून महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर दोन महिन्यांनीच मी एकनाथ शिंदेंना घेऊन नंदनवन येथे साडेचार तास बसलो होतो, असा दावा शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी केला आहे. दरम्यान, या दाव्यावरून उद्धव ठाकरे यांच्या आतेबहीण किर्ती फाटक यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. येत्या निवडणुकीत पुरंदरच्या बापूला गाडलेच पाहिजे, असे त्या म्हणाल्या. एबीपी माझ्या या वृत्तवाहिनीला त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
हेही वाचा – “माझ्यावर टीका करणारे वारकरी हे मोहन भागवत…”, ‘ते’ फडणवीसांचं षडयंत्र असल्याचं म्हणत सुषमा अंधारेंची टीका!
काय म्हणाल्या किर्ती फाटक?
“आतापर्यंत सर्व गद्दार-गद्दार असं म्हणत होतो. मात्र, मी आज त्यांच्यातला सुपर गद्दार बघितला, जो स्वत:च्या गुन्ह्याची कबुली देत होता. आपण खूप महान काम केलं आहे, असा त्याचा थाट होता”, अशी संतप्त प्रतिक्रिया किर्ती फाटक यांनी दिली आहे. “पूर्वी गांरबीचा बापू म्हणून कांदबरी होती. कोकणातल्या गारंबी गावातील बापूच्या प्रेमकथेवर ही कांदबरी होती. एक सामाजिक भान जपणारी आणि सामाजिक, वैचारिक क्रांती करणारी ही कांदबरी होती. त्यामुळे बापू म्हटलं तर गारंबीचा बाजू डोळ्यासमोर येतो. मात्र, आपल्याकडे सध्या एक निर्लज्य असा पूरंदराच बापू आहे. त्यांनी आज स्वतच्या पापाची कबुली दिली”, असेही ते म्हणाल्या.
“बापू म्हटलं की हा शब्द अनेक अर्थाने आपल्या समोर येतो. देशाचे बापू असतील किंवा गारंबीचे बापू असतील, पण या बापूने घरच्याच महिलेला फसवलं आणि आणखी तीन बायका केल्या, असा हा बापू आज आपल्या गुन्ह्याची कबुली देतो आहे, या गद्दाराला नेमकं काय म्हणायचं? हा बापू घातक आहे, याला येत्या निवडणुकीत गाडला पाहिजे”, असे आवाहनही त्यांनी शिवसैनिकांना केले.
हेही वाचा – “तनपुरे मटक्यावाले, वाळुमाफीया आणि ख्रिश्चन मिशनरींचे हस्तक…”, भाजपा आमदाराची राष्ट्रवादीच्या नेत्यावर टीका
विजय शिवतारे नेमकं काय म्हणाले होते?
मुंबईतील एका सभेत बोलताना, एकनाथ शिंदेंच्या मनात उठावाचे बीज मीच पेरलं, असा दावा विजय शिवतारे यांनी केला होता. “२०१९ मध्ये राज्यात जे महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झालं, ते राज्याच्या हिताचं नव्हतं. पहिल्या दोन महिन्यातच उचल खाल्ली होती. हा उठाव करायचं बीज एकनाथ शिंदेच्या डोक्यात विजय बापू शिवतारेंनी घातलं”, असे ते म्हणाले होते. तसेच “महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर दोन महिन्यांनीच मी एकनाथ शिंदेंना घेऊन नंदनवन येथे बसलो होतो. मी तेव्हाच त्यांना सांगितलं की, राज्यात जे सुरू आहे, ते महाराष्ट्राच्या हिताचं नाही, जे चाललं आहे ते चुकीचं आहे. तुम्ही उद्धव ठाकरेंना सांगा की ही महाविकास आघाडी तोडली पाहिजे. राज्यात शिवसेना भाजपाचे सरकार आले पाहिजे”, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली होती.
पुढे बोलताना, “शिवसेना-भाजपा युतीच्या ७० जागा उद्धव ठाकरेंनी स्वत: घालवल्या. कोणत्या जागा जिंकायच्या, कोणत्या जागा पाडायच्या, सरकार बनवण्यासाठी आकडेवारी कशी जोडायची, हे कट कारस्थान निवडणुकीच्या आधीच झालं होतं”, असा आरोपही त्यांनी केला होता.