Uddhav Thackeray : अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत एक वक्तव्य केलं. ज्यानंतर त्यांच्यावर कडाडून टीका केली जाते आहे. याबाबत उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) म्हणाले, “अमित शाह यांनी उद्दामपणे बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी उद्गार काढले. भाजपाची ही मनोविकृत वृत्ती आहे. बुरसटलेल्या रुढी परंपरांविरोधात माझ्या आजोबांनी लढा दिला, बाबासाहेब आंबेडकरांनीही लढा दिला. त्यांना खूप काही भोगावं लागलं होतं. तीच मनोविकृती आता पुन्हा राज्यावर आली की काय असं वाटू लागलं आहे. ही वृत्ती आता दूर करावी लागेल” असं उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) म्हणाले.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

“भाजपाचे नेते गेली अडीच ते तीन वर्षे आणि त्याआधीपासून काही उर्मट नेते, महाराष्ट्राचा, महापुरुषांचा, महाराष्ट्रातील दैवतांचा अपमान करत आहेत तो अपमान सहनशीलतेच्या पुढे गेला आहे. जेव्हा कोश्यारी नावाचे एक गृहस्थ महाराष्ट्राच्या राज्यपालपदी बसवले गेले होते तेव्हा महात्मा ज्योतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा अपमान केला होता. त्यांच्या लग्नाच्या वयावरुन त्यांनी विचित्र टिपण्णी केली होती. छत्रपती शिवरायांचा अपमानाही कोश्यारींनी केला होता. त्यावेळी भाजपाने त्यांना माफी मागायला सांगितली नाही. त्यांना पदावरुन दूर केलं नाही. मध्यंतरीच्या काळात छत्रपती शिवरायांचा पुतळा घाईने बसवण्यात आला, तो पुतळा आठ महिन्यांत पडला. त्यानंतर काय घडलं सगळ्यांना माहीत आहे. महाराष्ट्र गांडुळांचा प्रदेश आहे असं भाजपा नेत्यांना वाटतं आहे. महाराष्ट्राचं महत्त्व कमी केलं जातं आहे. अशात कहर झाला. आपल्या देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी अत्यंत उर्मटपणाने देशाला ज्यांनी घटना दिली त्या देशाच्या महामानवाचा अपमान केला. आंबेडकरांचं नाव घेणं फॅशन झाली आहे असा हिणकस आणि उद्दाम उल्लेख अमित शाह यांनी केला. हा भाजपाच्या ढोंगावरचा बुरखा फाटला आहे.” असं उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी म्हटलं आहे.

हे पण वाचा- Uddhav Thackeray on Amit Shah: “मुह में राम बगल में…” उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल

काँग्रेसबाबत प्रश्न विचारताच उद्धव ठाकरे काय म्हणाले?

यानंतर उद्धव ठाकरेंना काँग्रेसनेही बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधी भूमिका घेतली होती असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) म्हणाले, “दुसऱ्याने शेण खाल्लं म्हणून तुम्ही खात आहात का? अमित शाह यांनी काय केलं त्यावर बोला. अमित शाह उद्दामपणे वागत आहे, ही बाब संतापजनक आहे.”

अमित शाह यांच्यासारखा उद्दाम माणूस

संघाने आता खुलासा केला पाहिजे की अमित शाह यांच्याकडून हे बोल तुम्ही बोलून घेतलं आहे. अदाणीचं नाव घेतलं की आभाळ कोसळावं तसा भाजपा कोसळतो. जो आरोप करतो त्यावर भाजपाचे लोक लगेच टीका करु लागतात. आम्ही जे लोकसभेच्या वेळी म्हणत होतो की यांना संविधान बदलायचं आहे आता दुर्दैव असं आहे की लोकसभेत चर्चा ही संविधानावरच चर्चा सुरु आहे. ज्या बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान दिलं त्यांच्याबाबत अमित शाह यांच्यासारखा माणूस इतका तुच्छतेने कसा काय बोलू शकतो? याचं उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलं पाहिजे. त्यांनी एकतर अमित शाह यांच्यावर कारवाई करावी किंवा मग मोदींनी सत्ता सोडावी अशी मागणीही उद्धव ठाकरेंनी ( Uddhav Thackeray ) केली आहे.

Story img Loader