Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना टोला लगावला. यानंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी भाजपा नावाचा उर्मट पक्ष महापुरुषांचा अपमान करत आहे असं म्हटलं आहे. अमित शाह आणि भाजपा यांच्यावर उद्धव ठाकरेंनी कडाडून टीका केली आहे. तसंच रामदास आठवले, एकनाथ शिंदे, अजित पवार, नितीश कुमार, चंद्राबाबू या सगळ्यांना हा अपमान मान्य आहे का? असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

“भाजपाचे नेते गेली अडीच ते तीन वर्षे आणि त्याआधीपासून काही उर्मट नेते, महाराष्ट्राचा, महापुरुषांचा, महाराष्ट्रातील दैवतांचा अपमान करत आहेत तो अपमान सहनशीलतेच्या पुढे गेला आहे. जेव्हा कोश्यारी नावाचे एक गृहस्थ महाराष्ट्राच्या राज्यपालपदी बसवले गेले होते तेव्हा महात्मा ज्योतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा अपमान केला होता. त्यांच्या लग्नाच्या वयावरुन त्यांनी विचित्र टिपण्णी केली होती. छत्रपती शिवरायांचा अपमानाही कोश्यारींनी केला होता. त्यावेळी भाजपाने त्यांना माफी मागायला सांगितली नाही. त्यांना पदावरुन दूर केलं नाही. मध्यंतरीच्या काळात छत्रपती शिवरायांचा पुतळा घाईने बसवण्यात आला, तो पुतळा आठ महिन्यांत पडला. त्यानंतर काय घडलं सगळ्यांना माहीत आहे. महाराष्ट्र गांडुळांचा प्रदेश आहे असं भाजपा नेत्यांना वाटतं आहे. महाराष्ट्राचं महत्त्व कमी केलं जातं आहे. अशात कहर झाला. आपल्या देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी अत्यंत उर्मटपणाने देशाला ज्यांनी घटना दिली त्या देशाच्या महामानवाचा अपमान केला. आंबेडकरांचं नाव घेणं फॅशन झाली आहे असा हिणकस आणि उद्दाम उल्लेख अमित शाह यांनी केला. हा भाजपाच्या ढोंगावरचा बुरखा फाटला आहे.” असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

News About Parliament
BJP : उपराष्ट्रपती व्ही. पी. धनखड यांना हटवण्यासाठी विरोधकांचा गोंधळ, भाजपाने नेमकी काय खेळी केली?
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Peoples representatives do not want helmets then why police insisting Jan Manch organization Question
लोकप्रतिनिधींना हेल्मेट नको, मग पोलिसांचाच आग्रह का? जनमंचचे राजीव जगताप म्हणतात, ‘पायी चालणाऱ्यांनाही…’
Uddhav Thackeray On Raj Thackeray :
Uddhav Thackeray : “पक्षाला एक हेतू लागतो, पण हे त्या पक्षात…”, उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका
What Uddhav Thackeray Said?
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचं वक्तव्य, “जनतेच्या मनातला मुख्यमंत्री मी होतो तरीही…”
cm devendra fadnavis mns chief raj thackeray
Raj Thackeray: राज ठाकरेंबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; सरकारमध्ये सहभागी होण्याबाबत म्हणाले, “लोकसभेत त्यांनी…”
Yogi Adityanath on Bangladesh
Yogi Adityanath: “बाबरनं ५०० वर्षांपूर्वी अयोध्येत जे केलं, तेच आज बांगलादेशात होतंय”, थेट DNA चा उल्लेख करत योगी आदित्यनाथांची टीका
uddhave thackeray gears up for bmc polls tells party workers to take hindutva agenda
हिंदुत्वापासून दुरावल्याचा अपप्रचार खोडून काढा; उद्धव ठाकरे यांचा माजी नगरसेवकांना आदेश

भाजपाचं ढोंग आता समोर आलं आहे-उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरेंनी मुंबईत तातडीची पत्रकार परिषद बोलावली होती. या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे म्हणाले की भाजपाचं ढोंग आता समोर आलं आहे. त्यांचा बुरखा फाटला आहे. हिंदुत्व म्हणजे मुँह मे राम आणि बगल में छुरी असं यांचं हिंदुत्व आहे. यांना महाराष्ट्र संपवायचा आहे. आपल्याखेरीज दुसरं कुणीही देशात जन्माला आलाच नाही असं त्यांना दाखवून द्यायचं आहे. नेहरुंचं नाव घेत टीका करत होते आता हे बाबासाहेब आंबेडकरांवरही बोलू लागले. एवढी यांची हिंमत वाढली आहे. आता मला भाजपाला पाठिंबा देणारे जे नितीश कुमार आहेत, चंद्राबाबू आहेत ते काय करत आहेत हे विचारायचं आहे. तसंच रामदास आठवले काय करत आहेत? भाजपासह जे आमचे मिंधे गेले आहेत त्यांना आणि अजित पवारांना बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान मान्य आहे का? असाही सवाल उद्धव ठाकरेंनी केला.

अमित शाह यांच्यासारखा उद्दाम माणूस

संघाने आता खुलासा केला पाहिजे की अमित शाह यांच्याकडून हे बोल तुम्ही बोलून घेतलं आहे. अदाणीचं नाव घेतलं की आभाळ कोसळावं तसा भाजपा कोसळतो. जो आरोप करतो त्यावर भाजपाचे लोक लगेच टीका करु लागतात. आम्ही जे लोकसभेच्या वेळी म्हणत होतो की यांना संविधान बदलायचं आहे आता दुर्दैव असं आहे की लोकसभेत चर्चा ही संविधानावरच चर्चा सुरु आहे. ज्या बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान दिलं त्यांच्याबाबत अमित शाह यांच्यासारखा माणूस इतका तुच्छतेने कसा काय बोलू शकतो? याचं उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलं पाहिजे. त्यांनी एकतर अमित शाह यांच्यावर कारवाई करावी किंवा मग मोदींनी सत्ता सोडावी अशी मागणीही उद्धव ठाकरेंनी केली आहे.

Story img Loader