Uddhav Thackeray : जयश्री शेळकेंच्या प्रचारार्थ आज बुलढाण्यात उद्धव ठाकरेंनी सभा घेतली. या सभेत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा मावळ्यांच्या हाती शोभून दिसतो दरोडेखोरांच्या नाही असं म्हणत महायुतीवर आणि भाजपावर जोरदार टीका केली. तसंच मागच्या वेळी गद्दारांवर विश्वास ठेवला आणि चूक केली त्याबद्दल माफी मागतो असंही उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) म्हणाले.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

“तुम्ही सगळ्यांनी मिळून जयश्रीताईंना आमदारकी करा. आपलं बहुमत आल्यानंतर जालिंदरला आमदार करण्याचं काम माझं आहे. अशी माणसं हल्ली सापडत नाहीत. जालिंदरने संपूर्ण तयारी केली होती. त्याने फक्त माझा आदेश ऐकला आणि तो थांबला. त्याची जबाबदारी मी आता घेतली आहे. माझ्याकडे फसवाफसवी नाही. थोतांड नाहीत. मला शिवसेनाप्रमुखांनी सांगितलं होतं बाकी सगळ्या गोष्टी जातात आणि परत येतात. ट्रम्पही हरले होते परत निवडून आले. आपण शब्द दिला की काही वाट्टेल ते झालं तरी शब्द पडू द्यायचा नाही. ही निवडणूक शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी हे सगळे मित्रपक्ष आहेत. आपल्या विरोधात सगळे महाराष्ट्र द्रोही आहेत.” असं उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) म्हणाले.

Raj Thackeray Uddhav Thackeray (1)
Raj Thackeray : “शिवसेना उबाठाच्या होर्डिंगवर जनाब बाळासाहेब ठाकरे…”, राज ठाकरेंचा संताप; एकनाथ शिंदेंनाही सुनावलं
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Dombivli Raj Thackeray meeting, Raj Thackeray,
डोंबिवलीत राज ठाकरे यांच्या सभेच्या दिवशी बेशिस्तीने वाहने चालविणाऱ्या १९ वाहनचालकांवर गुन्हे
aditya thackeray criticized raj thackeray
“भाजपाचा मुख्यमंत्री बसावा असं स्वप्न बघणारे…”; आदित्य ठाकरेंची राज ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका!
Raj Thackeray on Code of Conduct
Raj Thackeray : “एकदा एक कॅमेरावाला बाथरूमपर्यंत…”, राज ठाकरेंनी सांगितली पूर्वीच्या आचारसंहितेच्या काळातील गंमत!
raj Thackeray Asilata Raje
Raj Thackeray : स्वातंत्र्यवीर सावरकरांची नात आहे राज ठाकरेंची बालमैत्रीण, म्हणाले, “आम्ही शिशूवर्गापासून…”
Raj Thackeray
Raj Thackeray : ‘अजित पवारांबरोबर बसणं म्हणजे मला श्वास घेता येईना म्हणणारे …’, राज ठाकरेंची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका
Raj Thackeray on shivsena and ncp split
Raj Thackeray Speech : शिवसेनेवर कुणाचा अधिकार? राज ठाकरेंनी स्पष्ट शब्दांत मांडली भूमिका; राष्ट्रवादी काँग्रेस फुटीवरही केलं भाष्य!

होय मागच्या वेळी माझी चूक झाली

छत्रपती शिवरायांचा झेंडा घेऊन नाचवत आहेत ते काही सगळेच मावळे नाहीत. गेल्या वेळी आपण चूक केली. मी निवडणुकीच्या प्रचारात फिरतो आहे तर पाहिलं की प्रत्येक ठिकाणी आपल्या विरोधात आपला गद्दार उभा राहिला आहे. साहजिकच आहे ही चूक माझी आहे कारण यांना तिकिट विश्वास ठेवून मी दिलं होतं. माझ्यावर विश्वास ठेवून तुम्ही त्या गद्दारांना निवडणून दिलं होतं. आता त्या चुकीची पुनरावृत्ती करणार नाही.

छत्रपतींचा भगवा दरोडेखोरांच्या हाती शोभून दिसत नाही

छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळे निर्माण केले होते. छत्रपती शिवरायांचा जो भगवा झेंडा आहे तो मावळ्यांच्या हातात शोभतो दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही. आपल्या पक्षावर दरोडा घातला. चाळीस जणांची टोळी आली दरोडा घालून पक्ष चोरुन नेला. आता म्हणत आहेत की हा पक्ष आमचा आहे. गद्दारच आहेत ते, खोकेबाज आणि धोकेबाज आहेत. पन्नास खोके आता नॉट ओके. आता यांनी एवढं कमावलं आहे की त्यांना हरवलं तरी काही फरक पडत नाही एवढं त्यांनी कमावलं आहे. असाही आरोप उद्धव ठाकरेंनी केला. ५० खोके तर आता सुट्टे पैसे झाले आहेत त्यांच्यासाठी असंही उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) म्हणाले.

हे पण वाचा- पनवेलमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेत फूट

चोर दरोडेखोरांना घेऊन आमच्यावर कसे चालून येता?

भाजपावाल्यांची आणि मोदींची आम्हाला कमाल वाटते आहे की तुम्ही चोर-दरोडेखोरांना घेऊन आमच्यावर कसे काय चालून येत आहात? भाजपाला कुणी ओळखत नव्हतं तेव्हा आम्ही तुम्हाला साथ दिली. शिवसेना नसती तर मोदीही पंतप्रधान झाले नसते आणि देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले नसते. हिंदुत्वाचा भ्रम तुम्ही निर्माण केलात. वर गेल्यानंतर आम्हाला लाथा घालू लागलात? ठीक आहे तुमचं तंगडं धरुन तुम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर भिरकावून दिलं नाही तर मी छत्रपती शिवाजी महाराज की जय हे बोलणार नाही. असंही उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) म्हणाले. बाहेरच्या राज्यातून या लोकांना प्रचारासाठी लोक आणावे लागत आहेत. यांनी काल परवाकडे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री विदर्भात फिरून गेले. एक नारा देऊन गेले की बटेंगे तो कटेंगे. कुणाची हिंमत आहे असं करण्याची? आम्हाला काय शिकवत आहात? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला. तसंच माझ्या बरोबर हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, बारा बलुतेदार सगळे आमच्या पाठिशी आहेत. योगीजी तुमच्या महायुतीकडे बघा. तुमच्या गुलाबी जॅकेटवाले म्हणाले बाहेरच्या लोकांनी येऊन लुडबूड करु नये. महायुतीत एकवाक्यता नसेल तर तुम्ही आम्हाला कशाला शिकवता? असाही प्रश्न उद्धव ठाकरेंनी ( Uddhav Thackeray ) विचारला.