Shivsena Podcast Interview: राज्यात पावसाळी अधिवेशनाच्या निमित्ताने राजकीय वातावरण तापल्याचं दिसत आहे. विधिमंडळात सत्ताधारी व विरोधकांमध्ये विविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहेत. त्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंची सविस्तर मुलाखत घेतली असून त्यामधून उद्धव ठाकरेंनी सत्ताधारी शिंदे गट, अजित पवार गट व भाजपावर हल्लाबोल केला आहे. ‘आवाज कुणाचा, पॉडकास्ट शिवसेनेचा’ या मुलाखतीमध्ये संजय राऊतांनी विचारलेल्या प्रश्नांवर उद्धव ठाकरेंनी परखड शब्दांत आपली भूमिका मांडली.

“त्यांना मोठं करणारी माणसं माझ्याबरोबर”

शिवसेनेतून मोठ्या प्रमाणावर माणसं बाहेर पडल्याबाबत संजय राऊतांनी विचारणा करताच उद्धव ठाकरेंनी त्यावरून टोला लगावला. “मोठे लोक बाहेर नाही पडले. तथाकथित मोठी माणसं बाहेर पडली. पण ज्यांनी त्यांना मोठं केलं ती माणसं माझ्यासोबत आहेत”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : “दाढी कुरवाळण्याच्या नादात जे काही पाप केले…” हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मनसेची उद्धव ठाकरेंवर टीका
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Uddhav Thackeray On Raj Thackeray :
Uddhav Thackeray : “पक्षाला एक हेतू लागतो, पण हे त्या पक्षात…”, उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका
What Uddhav Thackeray Said?
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचं वक्तव्य, “जनतेच्या मनातला मुख्यमंत्री मी होतो तरीही…”
raj thackeray cm devendra fadnavis
Raj Thackeray: …म्हणून राज ठाकरे विधानसभेला महायुतीत सहभागी झाले नाहीत, देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण; म्हणाले, “आमच्याकडे त्यांना…”!
cm devendra fadnavis mns chief raj thackeray
Raj Thackeray: राज ठाकरेंबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; सरकारमध्ये सहभागी होण्याबाबत म्हणाले, “लोकसभेत त्यांनी…”
uddhav devendra Fadnavis
“तू राहशील किंवा मी राहीन”, उद्धव ठाकरेंच्या आव्हानावर फडणवीसांचं संयमी उत्तर ऐकून शिवसेनेची सारवासारव
Devendra Fadnavis Answer to Uddhav Thackeray
Devendra Fadnavis : “एक तर तू राहशील किंवा मी राहिन”, उद्धव ठाकरेंच्या आव्हानावर काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?

उद्धव ठाकरेंप्रमाणे शरद पवार कायदेशीर लढाई करत नाहीत?

शिवसेना फुटल्यानंतर उद्धव ठाकरेंनी कायदेशीर लढा दिला. मात्र, शरद पवारांनी वेगळा मार्ग निवडल्याबाबत विचारणा केली असता उद्धव ठाकरेंनी त्यावर प्रतिक्रिया दिली. “ज्याचा त्याचा मार्ग असतो. मी शिवसेना प्रमुखांच्या मार्गाने चालणारा आहे. त्यामुळे जशास तसं उत्तर देणारा, आरेला कारे करणारा मी आहे. त्यामुळे मी लढतोय. शरद पवारांची विचारधारा वेगळी आहे. ते त्यांच्या पद्धतीने जाऊ इच्छित असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे”, असं ते म्हणाले.

“नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे मंत्री शरद पवारांकडे आशीर्वाद घ्यायला गेले. पण माझ्याकडे यायची कुणाची (शिंदे गट) हिंमत झाली नाही. बाळासाहेबांचे विचार चोरले वगैरे सगळं ढोंग होतं. राष्ट्रवादीला कंटाळून आम्ही बाहेर पडलो वगैरे ते म्हणाले होते. आता राष्ट्रवादीच्याच म्हणजे अजित पवारांच्याच हातात राज्याच्या तिजोरीच्या चाव्या गेल्या आहेत”, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर टीकास्र सोडलं आहे.

“पवारांची पहिली टीम सत्तेच्या दिशेनं रवाना, आता…”, राज ठाकरेंच्या आरोपाला आव्हाडांचं प्रत्युत्तर

“कुणी सांगितलं होतं राजीनामे घेऊन फिलायला?”

दरम्यान, खिशात राजीनामे घेऊन फिरतोय, या शिवसेनेच्या तत्कालीन मंत्र्यांच्या विधानावरही उद्धव ठाकरेंनी तोंडसुख घेतलं. “२०१४ ते १९ काळात सत्ता होती तेव्हा याच महाशयांनी भाजपाबरोबर कसं बसायचं, म्हणून मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. आत्ता तिकडे गेलेले त्या वेळचे तथाकथित मंत्री मी न सांगता तेव्हा बडेजाव मारत होते की खिशात आम्ही राजीनामे घेऊन फिरतो. कुणी सांगितलं होतं तुम्हाला राजीनामे घेऊन फिरायला? का वेळ आली होती ती तुमच्यावर? ही सगळी तुमचीच वक्तव्य आहेत”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

एकनाथ शिंदेंना केलं लक्ष्य

“आम्ही खिशात राजीनामे घेऊन फिरतो, भाजपा शिवसैनिकांवर अन्याय करते म्हणून मी त्यांच्याबरोबर बसू शकत नाही असं म्हणून कल्याणला जाहीर सभेत राजीनामे देणारे हेच होते. मग तेव्हा तुम्ही काय सोडलं होतं? आणि मी तरी काय सोडलं होतं? मला सगळं काही मिळालं आहे आणि मला उबग आलाय म्हणून मी आणखी काहीतरी मिळवायला जातोय असं कुणी बोलत नाहीये. मला आता सुखाचा वीट आलाय, सगळं मिळालं, आणखीन काय देणार म्हणून यापलीकडे जाऊन मी काहीतरी मिळवतोय असं म्हणून जा ना. हे सत्य आहे”, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

“शिवसेनेतल्या फुटीरांची माझ्या दारात यायची हिंमतच नाहीये. त्यांना माझा स्वभाव माहिती आहे. शिवसेनेची, बाळासाहेबांची विचारधारा काय आहे हे त्यांना माहिती आहे”, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला लक्ष्य केलं आहे.

Story img Loader