मुंबईत आज उद्धव ठाकरे गटाची महापत्रकार परिषद पार पडली. ही लढाई माझी एकट्याची नाही तर लोकशाही जिवंत ठेवण्याची लढाई आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. तसंच आपल्या भाषणात एकनाथ शिंदे आणि राहुल नार्वेकर यांना मैदानात माझ्यासमोर या आणि शिवसेना कुणाची ते हिंमत असेल तर जाहीर करुन दाखवा असं आव्हान उद्धव ठाकरेंनी दिलं आहे. तसंच आमची घटनाच नव्हती, आमच्याकडे कुठले अधिकारच नव्हते, कागदपत्रं नव्हती तर मग देवेंद्र फडणवीसांनी पाच वर्षे मुख्यमंत्रिपदाची खुर्ची कुणाच्या पाठिंब्यावर उबवली ? असाही सवाल उद्धव ठाकरेंनी केला आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

“सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या चौकटीत हे निकाल देतील असं वाटलं होतं. कोर्ट फाशीची शिक्षा सुनावतं आणि जल्लाद ती प्रत्यक्ष फाशी देतो. त्या जल्लादाचं काम या लवादाला दिलं होतं. सर्वोच्च न्यायालयाने सगळी तयारी केली होती. मात्र लवाद म्हणतो मी फाशी कशी देऊ याचा जन्माचा दाखलाच नाही. असं म्हणत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर उद्धव ठाकरेंनी टीका केली. हे काय आमची घटना गिळून बसलेत का?” असाही प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हे पण वाचा- उद्धव ठाकरे आक्रमक! “एकनाथ शिंदे, राहुल नार्वेकरांना माझं खुलं आव्हान आहे मैदानात सुरक्षा न घेता या आणि…”

जे. पी नड्डांचं ते वक्तव्य

“२०२२ मध्ये जे.पी. नड्डा अध्यक्ष म्हणून इथे आले होते ते असं म्हणाले होते देशात एकच पक्ष म्हणाले होते की देशात एकच पक्ष राहणार तो म्हणजे भारतीय जनता पक्ष. ही सगळी सुरुवात तिथून झालेली आहे. मग ईडी, सीबीआय, निवडणूक आयोग, लवाद हे सगळे गारदी एकत्र केले आणि घाव घालायला सुरुवात केली. राष्ट्रवादीचंही वेगळं काही चाललेलं नाही. संपूर्ण देशात त्यांचं हेच चाललं आहे. सगळे पक्ष संपवून एकच पक्ष राहणार असं राष्ट्रीय पक्षाचा अध्यक्ष बोलत असेल तर लोकशाहीचा डंका पिटणाऱ्या निवडणूक आयोगाला हे मान्य आहे का? असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. अत्यंत घातक पद्धतीने ही लढाई सुरु आहे.” असं उद्धव ठाकरे म्हणाले

मोदींना पाठिंबा देण्यासाठी का बोलवलं?

“शिवसेनेची १९९९ मध्ये झालेली घटना ही जर अंतिम यांनी मानली, त्यापुढचे बदल मान्य केले नाहीत तर मग २०१४ ला मला काय म्हणून मोदींना पाठिंबा देण्यासाठी बोलवलं होतं? २०१९ ला कशासाठी मला पाठिंबा द्यायला बोलवलं? कुठल्यातरी ढोकळेवाल्याची किंवा शेव-फाफडावाल्याची सही घ्यायची होती. २०१९ किंवा २०१४ जी रांग बसली होती त्यात पंतप्रधान मोदी म्हणाले होते की आता बाळासाहेब हयात राहिले नाहीत. जर काही सल्लामसलत करायची असेल तर मी उद्धव ठाकरेंशी करतो. मी काय असाच होतो का? तुमचे त्यावेळचे महनीय अध्यक्ष अमित शाह हे माझ्याकडे आले होते. नंतर सांगितलं होतं की असं काही बोलणं झालंच नाही तर मग आले कशाला होते?” असं उद्धव ठाकरेंनी विचारलं आहे.

देवेंद्र फडणवीसांवर कडाडून टीका

“२०१९ ला माझ्या शिवसेनेचा पाठिंबा होय माझ्या शिवसेनेचाच कारण हा माझ्या वडिलांचा पक्ष आहे. पाठिंबा घेताना लाज वाटली नाही का? मी माझा पाठिंबा म्हणजे तुम्हा सगळ्यांचा पाठिंबा. २०१४ ते २०१९ या कालावधीत देवेंद्र फडणवीसांनी पाच वर्षे जे मुख्यमंत्रिपद उबवलं ते कुणाच्या पाठिंब्यावर? आत्ताही तुम्ही पाहिलं असेल मिंधे-फिंदे कोण होते त्यांना पदं कुणी दिली? १९९९ नंतर पदं दिली, एबी फॉर्म दिले होते की नव्हते?” असे प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारले आहेत.

Story img Loader