Uddhav Thackeray शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. वेशांतर करुन देशाच्या सुरक्षेशी खेळ करणारा आणि पक्ष फोडणारा उपमुख्यमंत्री नको असं उद्धव ठाकरेंनी भाष्य केलं आहे. तसंच अनिल देशमुख आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात जे आरोप प्रत्यारोप झाले त्यावरुनही देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

“अनिल देशमुख यांनी त्यावेळीही मला सांगितलं होतं. तसंच मध्यंतरी आमची भेट झाली त्यावेळीही मला त्यांनी हे सगळं प्रकरण सांगितलं होतं. काय पद्धतीने घृणास्पद काम करणारे लोक सत्तेवर आहेत बघा. हे सगळेजण अमानुष आहेत. कुटुंब बघत नाहीत, मुला बाळांवर घाणेरडे आरोप करुन त्यांचं आयुष्य बरबाद करत आहेत. त्यांना हे कळत नाही की मुलं त्यांनाही आहेत. उद्या त्यांच्या मुलाबाळांवर आरोप केले तर कळेल आई वडिलांचं दुःख काय असतं. पूर्वीचा भारतीय जनता पक्ष वेगळा होता. आत्ताचा अत्यंत घृणास्पद आणि अमानुष पद्धतीने काम करणारा आहे. ही वृत्ती देशातून आणि महाराष्ट्रातून नष्ट झालीच पाहिजे.” असं उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) म्हणाले.

“उरणची घटना जी काही घडली ती भयंकर आहे. अंबादास दानवे तिकडे जाऊन आले आहेत. जी घटना घडली आहे त्याकडे राज्यकर्त्यांचं लक्षच नाही.” असं उद्धव ठाकरेंनी ( Uddhav Thackeray ) म्हटलं आहे. उरणमध्ये यशश्री शिंदे या मुलीची हत्या करण्यात आली. त्याबाबत विचारलं असता उद्धव ठाकरेंनी हे उत्तर दिलं आहे.

उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत काय म्हटलं आहे?

हे पण वाचा- “मी संन्यास घेतलेल्या लोकांबद्दल…”, उद्धव ठाकरेंचा आशिष शेलारांना अप्रत्यक्ष टोला

पक्ष फोडण्यासाठी देवेंद्र फडणवीस वेष बदलून…

राज्याच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर आहे, संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केलं आहे. नाव बदलून, दुसऱ्यांना टोप्या घालून जात असतील तर भयंकर बाब आहे. विमानतळाची सुरक्षा बोगस आहे हेच त्यांनी बाहेर काढलं आहे. राज्याचा उपमुख्यमंत्री किंवा माजी विरोधी पक्षनेता वेशांतर करुन देशाच्या गृहमंत्र्यांना भेटत असेल तर गृहमंत्र्यांना हे मान्य आहे का? देशाच्या सुरक्षेचा विभाग त्यांच्याकडे आहे. त्यांच्याकडे वेशांतर करुन येणारा माणूस मान्य आहे का? जो सरकार पाडण्यासाठी, पक्ष फोडण्यासाठी जो गृहमंत्री खेळ करतो आहे तो जागेवर राहताच कामा नये. या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. जो गृहमंत्री आपले अधिकार पक्षाच्या हितासाठी वापरतो आहे तो गृहमंत्री देशाचा गृहमंत्री म्हणून राहण्यास लायक नाही असा टोला उद्धव ठाकरेंनी ( Uddhav Thackeray ) अमित शाह यांना लगावला आहे.