ठाण्यात शिंदे गटाच्या काही महिला कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या एक महिला रोशनी शिंदे यांना मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या मुद्द्यावरून राजकारण तापत असतानाच खुद्द उद्धव ठाकरे यांनी रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासमवेत ठाण्यात रुग्णालयात जाऊन या महिलेची विचारपूस केली. यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर परखड शब्दांत हल्लाबोल केला. “राज्याला फडतूस गृहमंत्री लाभलाय”, असा उल्लेख उद्धव ठाकरेंनी यावेळी केला.

“एक फडतूस गृहमंत्री आपल्याला लाभला आहे. अत्यंत लाचार, लाळघोटेपणा करणारा, उपमुख्यमंत्रीपद मिळालं म्हणून नुसती फडणविसी करणारा एक माणूस गृहमंत्री म्हणून मिरवतोय. पण त्यांच्याच कार्यकर्त्यांवर मिंधे गटाच्या आमदारानी हल्ला केला, तरी कुठे काही हलायला तयार नाही”, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

Uddhav Thackery News
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचा सवाल, “पंतप्रधान मोदींनी महाकुंभात डुबकी मारली, पण गणपती विसर्जन करु देत नाही हेच तुमचं हिंदुत्व?”
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Devendra Fadnavis to Inaugurate TJD Deccan Summit 2025
ठाकरे, पवारांचे आधीच ठरले होते, मुख्यमंत्री फडणवीस यांचे मोठे वक्तव्य !
viral video
Video : हे काय चाललंय पुण्यात! वाहतूक पोलिसाच्या अंगावर धावून आली व्यक्ती, नेमकं काय प्रकरण काय?
PM Narendra Modi Speech
Narendra Modi : आणीबाणी ते कलाकारांवर बंदी! नरेंद्र मोदींनी ‘हे’ पाच मुद्दे उपस्थित करत काँग्रेसला करुन दिली संविधानाची आठवण
Narendra Modi target arvind Kejriwal in lok sabha speech
निधीचा वापर देशासाठीच! पंतप्रधानांचे लोकसभेत प्रत्युत्तर; केजरीवाल यांच्यावर टीका
Pratap Patil Chikhlikar on Ashok Chavan
Pratap Patil Chikhlikar : प्रताप पाटील चिखलीकरांचा अशोक चव्हाणांना मोठा इशारा; म्हणाले, “जर कोणात खुमखुमी असेल तर…”
selena gomez crying video america imigration policy
Video : “माझ्या लोकांवर हल्ले…”; डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘त्या’ निर्णयामुळे रडली सेलेना गोमेझ, नेमकं काय घडलं?

“…तर फडतूस गृहमंत्र्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही”

“यांची गुंडगिरी वाढायला लागली आहे. ठाण्यात एका पत्रकाराला धमकी देण्यात आली. महिलांना मारहाण केली जातेय. त्या महिलेला आम्ही भेटलो. त्या म्हणतायत की त्यांनी अशी कोणतीही कमेंट केली नाही. त्यांच्याकडून माफी मागण्याचा व्हिडीओ करून घेण्यात आला. तोही त्यांनी दिला. तरी आणखीन महिलांना बोलवून मारहाण करण्यात आली. मला वाटतं फडतूस गृहमंत्र्यांना पदावर राहाण्याचा अधिकार नाही”, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांवर टीकास्र सोडलं.

“ज्या मुली आपली पातळी सोडून बोलतात, त्यांना समज देणं आमचं काम”, ठाणे राडा प्रकरणी शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांची भूमिका!

“फडणवीसांच्या घरावर काही आलं तर लगेच एसआयटी नेमली जाते. बाजूच्या राज्यात जाऊन अटका केल्या जातात. त्यांच्या पक्षातल्या लोकांवर मिंधे गटाकडून हल्ले झाले, तर तिथे ही फडणवीसी दाखवण्याची त्यांची हिंमत नाहीये. एकूणच गुंडगिरीचं राज्य आहे. यांना मुख्यमंत्री म्हणायचं का गुंडमंत्री म्हणायचं हे लोक ठरवतील. त्यांनी जाहीर करावं, मंत्रीमंडळाच्या विस्तारात एक खातं निर्माण करावं आणि गुंडमंत्री असं पद निर्माण करून गुंड पोसण्याचं काम त्या मंत्र्याकडे द्यावं”, असा खोचक सल्लाही उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारला दिला आहे.

नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याचा दावा करत शिंदे गटाच्या काही महिलांनी ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे यांना रविवारी समज देण्याचा प्रयत्न केला. हे ही चर्चा विकोपाला जाऊन त्यांच्यामध्ये धक्काबुक्की सुरू झाल्याचं सीसीटीव्हीमध्ये दिसून येत आहे. यानंतर रोशनी शिंदे यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तिथून त्यांना स्पंदन हॉस्पिटलमध्ये आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं आहे. या महिलेची आज उद्धव ठाकरेंनी ठाण्याच्या रुग्णालयात जाऊन भेट घेतली.

Story img Loader