मी भाजपाला सोडलं म्हणजे हिंदुत्व सोडलं नाही. त्यांचं हिंदुत्वाच्या नावाखाली जे काही थोतांड चाललं होतं त्यामुळे मी त्यांना सोडलं. आमचं हिंदुत्व कुणावर अन्याय करणारं हिंदुत्व नाही. मोदींचं जे काही चालतं ते म्हणजे निवडणूक जिंकेपर्यंत सबका साथ आणि निवडणूक जिंकल्यावर मित्राचा विकास. हे आमचं हिंदुत्व नाही. ज्या कठीण काळात शिवसेनेने तुम्हाला साथ दिली त्याच शिवसेनेवर हे उलटले. आमदार, नगरसेवक निवडून आले त्याचंही अप्रुप वाटायचं. वाजपेयी पंतप्रधान झाले तेव्हाही आनंद झाला. शिवसेना आणि भाजपामध्ये युतीच्या काळात सत्ता किती काळ आमच्याकडे होती? पण कठीण काळात आम्ही साथ दिली होती. पण हे माडीवर चढले आणि आम्हाला लाथ मारु लागले. हा आपमतलबीपणा देशाला घातक आहे. असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरेंनी ( Uddhav Thackeray ) जागर महाराष्ट्र धर्माचा या मेळाव्याला उपस्थिती दर्शवली होती. त्यावेळी त्यांनी मोदी आणि शाह यांच्यावर तसंच भाजपावर टीका केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा