उद्या शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. परवा जागतिक गद्दार दिन आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि शिंदे गटावर टीका केली आहे. शिवसेनेचा वर्धापन दिन होण्याआधी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा मेळावा मुंबईत घेण्यात आला. त्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी ही टीका केली आहे. आपल्या भाषणात त्यांनी एकनाथ शिंदेंसह भाजपाचा समाचार घेतला.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
आमदार चोरून, खासदार फोडून सत्ता विकत घेता येते. पण जिवाला जीव देणारे सोबती विकत घेता येत नाहीत. ते सोबती मला लाभले आहेत ही बाळासाहेब ठाकरेंची पुण्याई आहे. तुमचं ऋण मी कितीही प्रयत्न केला तरीही फेडू शिकणार आहे. कागदावर माझ्याकडे पक्षाचं नावही नाही आणि चिन्ह नाही. तुम्ही सगळ्यांनी रक्ताचं पाणी केलं. त्यानंतर आपण जी पदं त्यांना दिली ते लाचार मिंधे सत्तेच्या मोहासाठी आणि खोक्यांसाठी पलिकडे गेले. आत्ता तुम्हाला माझ्याकडे देण्यासारखं काहीच नाही तरीही तुम्ही माझ्यासह आहात. हे सगळं पाहिल्यानंतर मी भारावून गेलो आहे.
हे पण वाचा- Sanjay Raut: ‘शिंदेची जत्रेतील शिवसेना, जत्रा उठली की तंबू देखील उठतील’; संजय राऊतांची टीका
परवा जागतिक गद्दार दिन
उद्या शिवसेनेचा वर्धापन दिन आणि परवा जागतिक गद्दार दिन. आपल्या लोकांनी केलेल्या गद्दारीला २० जूनला एक वर्ष पूर्ण होईल. मात्र त्यानंतर मागचं वर्षभर जी लोकं भेटत आहेत, कुणीही असोत. शिवसैनिक, हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन सगळे सांगत आहेत की आम्ही तुमच्या बरोबर आहोत. कोव्हिडमध्ये आपण काय काम केलं ते तुम्ही आणि सगळ्यांनीच पाहिलं आहे. जो सुखमें साथ रहते है उनको रिश्ते कहते हैं जो दुखमे साथ देते आहे उन्हे फरिश्ते कहते हैं. तुम्ही जोपर्यंत माझ्यासोबत आहात तोपर्यंत कितीही शाह आणि अफझल खान आले तरी मला पर्वा नाही असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
हे पण वाचा- उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदावर आज शिक्कामोर्तब
आता कळलं ना अफझल खान का म्हटलं?
२०१४ नंतर अफझल खान हा शब्द वापरला होता. तेव्हा लोक मला म्हणाले हे तुम्ही काय बोलत आहात? आता कळलं ना तुम्हाला अफझल खान कसा आहे? मला संताप एका गोष्टीचा येतो की हे सगळे उपरे आपल्याला आपल्या घरात येऊन फोडाफोडी करत आहेत. त्यांना एवढंच सांगतोय आम्ही नामर्दांची अवलाद नाही. आत्ता मी म्हटलं तर तो इशारा महाराष्ट्रातही देऊ शकतो. सत्तेची मस्ती आहे, फुगलेला फुगा फोडायला आम्हाला वेळ लागणार नाही. एवढीच तुमची मस्ती दाखवायची असेल तर मणिपूरमध्ये जा आणि दाखवा असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.