माजी मुख्यमंत्री तथा शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा सध्या कुटुंब संवाद दौरा चालू आहे. यानिमित्त उद्धव ठाकरे यांनी रविवारी (४ फेब्रुवारी) कणकवली येथील जनतेशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी कोकणातील जनतेला आगामी निवडणुकीत ठाकरे सेनेला साथ देण्याची विनंती केली. माजी मुख्यमंत्र्यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारतीय जनता पार्टी आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे यांनी कणकवलीच्या सभेत बोलताना जून २०२२ मध्ये शिवसेनेत पडलेल्या फूटीवर भाष्य केलं. उद्धव ठाकरे म्हणाले, माझे आमदार फुटत आहेत याची मला कल्पना होती. परंतु, हे नासके आंबे मला माझ्या पेटीत नको होते. त्यामुळे मी ते जाऊ दिले.

उद्धव ठाकरे म्हणाले, आपल्याला महाराष्ट्राच्या विधानसभेवर आपल्या भगव्याची प्रतिष्ठापना करायची आहे. त्याचबरोबर दिल्लीच्या तख्तावरही आपला भगवा फडकवायचा आहे. असं केल्यास तो आपल्यासाठी यशाचा एक क्षण असेल. असे हे क्षण आपण छत्रपती शिवाजी महाराजांकडून मागून घेत आहोत. मला सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचं आहे. मी मुख्यमंत्री झालो होतो. त्यावेळी नाईलाजाने मला ते पद स्वीकारावं लागलं होतं. कारण माझे परतीचे दोर कापले गेले होते.

Uddhav Thackeray on Pankaja Munde
Uddhav Thackeray: “पंकजाताई मुंडे तुझे धन्यवाद…”, उद्धव ठाकरेंनी केलं कौतुक; म्हणाले, ‘तुम्ही महाराष्ट्राच्या डोळ्यावरची पट्टी काढली’
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Uddhav Thackeray speech
“…अन् प्रियांका गांधींनी भाजपाचे दात घशात घातले”, पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ आव्हानाला उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर
raj thackeray latest news
काँग्रेसबरोबर युती करण्यावरून राज ठाकरेंची पुन्हा उद्धव ठाकरेंवर सडकून टीका; म्हणाले, “मी, माझा स्वार्थ, माझी खुर्ची अन्…”
Uddhav Thackeray Speech in Ausa Latur
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंची खोचक शब्दांत टीका, “महायुतीला मत म्हणजे गुजरातला मत, कारण..”
What Raj Thackeray Said?
Raj Thackeray : ‘सत्तेत जायचा फॉर्म्युला काय?’ राज ठाकरे म्हणाले, “या निवडणुकीत..”
Amit Shah made special mention of Devendra Fadnavis in speech in shirala
अमित शहांनी फोन काढला आणि थेट फडणवीसांना लावला… म्हणाले, “पुन्हा…”

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, मुख्यमंत्रिपद सोडताना मी जराही विचार केला नाही की हे पद कसं सोडू… मला जर त्या पदाला चिकटून राहायचं असतं तर मी चिकटून राहू शकलो असतो. मला काय कळलं नव्हतं माझे आमदार फुटतायत ते… त्यांना पकडून मी हॉटेलात टाकू शकलो नसतो का? त्या मिंद्याचं काय… त्याला कुठूनही धरून, खेचून आणला असता… पण मला हे सडके आंबे नको होते. आंब्याच्या पेटीत एक जरी नासका आंबा असेल तर अख्खी पेटी नासते. म्हणून मी सर्वात आधी नासके आंबे उचलून फेकून दिले.

हे ही वाचा >> राजीनामा दिल्यानंतर कॅबिनेटमध्ये काय घडलं? छगन भुजबळ म्हणाले, “मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी बोलावून घेतलं अन् मला…”

माजी मुख्यमंत्री म्हणाले, मी माझ्या पेटीतले नासके आंबे फेकून दिले आहेत आणि आता आपल्याबरोबर हे मर्द आहेत. मर्दासारखे मर्द आपल्यासाठी उभे आहेत. हे मर्द जोपर्यंत माझ्याबरोबर आहेत तोवर मला कोणाचीही परवा नाही. मी लढायला उभा आहे, फक्त तुम्ही (जनता) माझी साथ देणार की नाही? या कणकवली मतदारसंघात तुम्ही मला विजय देणार आहात की नाही? या मतदार संघातसुद्धा आपला जो उमेदवार असेल त्याला तुम्हाला विजयी करावंच लागेल. ही सगळी कोकणची किनारपट्टी आपल्याला भगवी करायची आहे. इथे आपले खासदार तर आहेतच, आता आणखी काही आमदार निवडून आणायचे आहेत.