मणिपूरहून निघालेल्या राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’चा आज (१७ मार्च) मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कवरील जाहीर सभेने समारोप झाला. या निमित्ताने विरोधकांच्या इडिया आघाडीने लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले. मणिपूरमधून निघालेली राहुल गांधी यांची यात्रा दोन महिन्यानंतर सुमारे ६,७०० किलोमीटरचा प्रवास करून दादर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चैत्यभूमी या स्मारकस्थळी शनिवारी दाखल झाली. त्यानंतर आज राहुल गांधी यांनी शिवाजी पार्कवर त्यांच्या यात्रेचा समारोप केला. शिवाजी पार्कवर इंडिया आघाडीचे अनेक मोठे नेते उपस्थित होते. जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला, तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के स्टॅलिन यांच्यापासून ते शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि ज्येष्ठ नेते शरद पवारांपर्यंत अनेक मोठे नेते यावेळी इंडिया आघाडीच्या मंचावर उपस्थित होते.

यावेळी, उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्र डागलं. उद्धव ठाकरे म्हणाले, मी नेहमी सांगतो माझा देश हाच माझा धर्म आहे आणि आपला हा देश वाचला तर आपण वाचू. आपला देश हीच आपली किंवा एखाद्या व्यक्तीची ओळख असली पाहिजे. एका व्यक्तीवरून देशाची ओळख होता कामा नये. कोणी कितीही मोठा असला तरी माझा देश त्याच्यापेक्षा मोठा आहे. आपण म्हणतो हा माझा देश आहे, या देशाच्या सरकारला भारत सरकार म्हणतो. परंतु, ते लोक ‘मोदी सरकार, मोदी सरकार अशी जाहिरात करताय. तुमच्या डोक्यात माझ्या देशाचं नाव बदलण्याचं स्वप्न आहे का? भारत हे माझ्या देशाचं नाव आहे आणि आम्ही ते कोणालाही बदलू देणार नाही.

Image of Manmohan Singh's sister
Manmohan Singh Death : मनमोहन सिंग यांच्या बहिणीची व्यथा, आजारपणामुळे घेता येणार नाही भावाच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
Image Of India Alliance Leaders.
AAP vs Congress : “तर काँग्रेसला इंडिया आघाडीतून बाहेर काढायला लावू”; काँग्रेसला भाजपाकडून निधी, आपचे गंभीर आरोप
dhananjay munde valmik karad santosh deshmukh murder
Dhananjay Munde: “हे असले बॉस?” धनंजय मुंडेंचं हातात पिस्तुल घेतलेलं रील शेअर करत अंजली दमानियांची पोस्ट; ‘त्या’ व्हिडीओचाही समावेश!
Image Of Dhananjay Munde
Dhananjay Munde : “माझ्याजवळचा असला तरी सोडू नका”, संतोष देशमुख हत्येप्रकरणी धनंजय मुंडेंकडून फाशीची मागणी
Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray
Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणाले, “२०१९ मध्ये मोठी गद्दारी…”
News BJP
BJP : भाजपा निवडणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष, कुठल्या खास निकषांवर होणार निवड?

उद्धव ठाकरे म्हणाले, आजपर्यंत आपण अनेक अनुभव घेतले. आम्हाला असं वाटत होतं की, देशासाठी मजबूत सरकार पाहिजे. आम्हाला आता अनुभवानंतर खूप काही कळलंय. पूर्वी आपलं युतीचं सरकार होतं. अटल बिहारी वाजपेयी देशाचे पंतप्रधान होते. त्या सरकारमध्ये अनेक पक्ष होते. आम्ही होतो, ममता बॅनर्जी होत्या, जयललिता होत्या. अटलजींनी उत्तम प्रकारे सरकार चालवलं होतं. त्यानंतर नरसिंह राव यांचं सरकार आलं, त्यानंतर मनमोहन सिंग यांचं सरकार आलं. देश उत्तम प्रकारे प्रगती करत होता. परंतु, २०१४ पासून एका पक्षाचं सरकार आहे. त्यानंतर २०१९ मध्येही तेच आले. आता ते २०२४ च्या गोष्टी करतायत. तसेच ते लोक म्हणतायत की ‘विरोधक अद्याप २०२९ मध्ये अडकलेत, मात्र आम्ही २०४७ ची तयार केली आहे.’ मला त्यांना सांगायचं आहे की, कुठलाही राज्यकर्ता सत्तेचा अमरपट्टा घेऊन येत नाही. देशाच्या जनतेसमोर हुकूमशाह कितीही मोठा असला तरी सगळी जनता एकवटते तेव्हा हुकूमशाहाचाही अंत होतो. आपल्या देशात आता ती वेळ आली आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. आपला इतिहास आहे की, फोडा आणि राज्य करा अशी ज्याची नीती असेल त्याच्या छाताडावर आपण राज्य करायचंय. ते लोक म्हणतील, ‘अब की बार ४०० पार, आपण मात्र ‘अब की बार भाजपा तडीपार’वर कायम राहायचं आहे. त्यासाठीच आज आपण या शिवतीर्थावरून रणशिंग फुंकलंय.

Story img Loader