आज फक्त कार्यालयाचं उद्घाटन आहे तर इतकी गर्दी झाली आहे तर मग विजयाच्या मिरवणुकीला किती गर्दी होईल? विचार करा. रायगड आणि मावळ हा मतदारसंघ म्हणजे एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान आणि दुसऱ्या बाजूला त्यांची राजधानी. अशा ठिकाणी आपला पवित्र भगवा फडकणार नाही तर मग दुसरं कुठलं फडकं फडकणार? असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी भाजपा, शिंदे गट आणि अजित पवार गटावर तुफान टीका केली. तसंच मी पुन्हा येईन या देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचा संदर्भत ठाकरी शैलीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही समाचार घेतला.

काय म्हणाले उद्धव ठाकरे

“देशात पहिली निवडणूक होते असा भाग नाही. पण भाजपाचं सरकार चुकून आलं तर ही या देशातली शेवटची निवडणूक ठरेल. आजपर्यंत छातीठोकपणे सांगितलं होतं की पुन्हा येईन. दिल्लीतले लोकही तेच सांगत आहेत मी पुन्हा येईन पण पुन्हा येईन स्वतःच्या घरात जातात. ते परत लोकसभा किंवा विधानसभेत येऊ शकत नाहीत. एवढाच जर पुन्हा येईनचा आत्मविश्वास आहे तर फोडाफोडी कशाला करता? भाजपाला संकटात ज्या पक्षाने साथ दिली, त्या शिवसेनाप्रमुखांच्या शिवसेनेला तुम्ही संपवायला निघालात. इतके नतद्रष्ट राजकारणी या देशात जन्माला आले असतील असं वाटत नाही. जर शिवसेना नसती आणि शिवसेनेने खांद्यावर बसवून तु्म्हाला महाराष्ट्र फिरवला नसता तर तुम्हाला खांदा द्यायला चार लोकही जमले नसते.” असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपावर कडाडून टीका केली आहे.

News About Parliament
BJP : उपराष्ट्रपती व्ही. पी. धनखड यांना हटवण्यासाठी विरोधकांचा गोंधळ, भाजपाने नेमकी काय खेळी केली?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Shivsena UBT News
Shiv Sena UBT : “ठाकरेंच्या शिवसेनेला नाकारण्याचा जनतेचा निर्णय किती योग्य, हेच पुन्हा अधोरेखित होतंय”, भाजपा नेत्याची आगपाखड
jayant patil devendra fadnavis maharashtra assembly session
Video: “सासऱ्यांचाच आग्रह होता की…”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!
Jayant Patil, Islampur Jayant Patil, Jayant Patil Sharad Pawar Group, Jayant Patil latest news,
राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यासमोर मतदारसंघात कडवे आव्हान
ajit pawar rahul narvekar
Video: “जे आहे ते आहे, लाडक्या बहिणीनेच आम्हाला…”, अजित पवारांची विधानसभेत स्पष्टोक्ती!
What Devendra Fadnavis Said About Rahul Narwekar ?
Devendra Fadnavis : “राहुल नार्वेकर पुन्हा येईन म्हणाले नव्हते तरीही पुन्हा आले..”, देवेंद्र फडणवीस यांचं खुमासदार भाषण
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : “दाढी कुरवाळण्याच्या नादात जे काही पाप केले…” हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मनसेची उद्धव ठाकरेंवर टीका

सर्वपक्षीय शेठ म्हणत कुणाकडे अंगुलीनिर्देश?

आपल्या भाषणात उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “इथल्या खासदाराने गद्दारी केली आहे त्याला तर आडवा करायचाच पण जे सर्वपक्षीय शेठ आहेत म्हणजे काय ज्यांचं सरकार येतं त्यांच्याकडे जायचं. कुठेही गेलं की आपलं दुकान चालू.. म्हणजे राजकारणातली दुकानदारी करणारे आहेत त्यांची दुकानं बंद करायची आहेत. मी भाजपाबाबत म्हटलं आहे की अब की बार भाजपा तडीपार ते करायचं आहे. कारण इतका खोटारडा पक्ष देशाच्या राजकारणात जन्माला आला नव्हता.”

भाजपाने जुमल्यानं नाव बदलून मोदी गॅरंटी ठेवलं

मी माझ्या भाषणात रविवारी जे बोललो ते आज पुन्हा सांगतोय दहा वर्षांत केलं काय? काँग्रेसच्या काळातल्या योजनांची नावं बदलली, स्थानकांची नावं बदलली. हे नावंही त्यांच्या नेत्यांची नावं देतात. नावं देता देता जुमल्याचंही नाव बदललं आणि मोदी गॅरंटी ठेवलं.” असाही टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.

कट्टर शिवसैनिक माझ्याबरोबरच आहेत

“एवढी फोडाफोडी केली, तरीही कट्टर शिवसैनिक हे शिवसेनेबरोबरच आहेत. त्यांना शिवसेनेने फक्त प्रेम दिलं. बाळासाहेबानंतर इतकी वर्षे झाली पण त्यांनी शिवसेना सोडली नाही. याला म्हणतात निष्ठा. हे जे काही गद्दार आहेत त्या गद्दारांचा नायक आहे त्यालाही विचारा तू दाढी खाजवत जरा आठव.. कारण आपण काही आठवायचं असेल तर डोकं खाजवतो हा दाढी खाजवतो. पैसे खूप आहेत दाढी खाजवायलाही माणसं ठेवली असतील तर माहीत नाही. पण तुम्हाला मी काय दिलं नव्हतं? शिवसेनेने देता येईल ते सगळं तुम्हाला दिलं तरीही पाठीत वार केला. शिवसेना ही ओळख तुमच्यासमोर आले म्हणून निवडून आलात. यांना वाटलं की घोड्यावर बसलोय म्हणजे घोडा माझाच. आता घोडा कसा लाथ घालतो ते कळेल आता. असं म्हणत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवरही टीका केली.

Story img Loader