राहुल नार्वेकर यांच्यावर आज उद्धव ठाकरेंनी अत्यंत गंभीर आरोप केला आहे. कळंब, धाराशिव या ठिकाणी काही वेळापूर्वीच उद्धव ठाकरेंची सभा पार पडली. या सभेत उद्धव ठाकरेंनी राहुल नार्वेकरांना लालुच दिलं गेलं त्यामुळेच त्यांनी शिवसेना माझी नाही असा निकाल दिला. सर्वोच्च न्यायालयाने राहुल नार्वेकरांना प्रश्न विचारला आहे की तुम्ही जो निर्णय घेतलात तो आमच्या निर्णयाच्या विरुद्ध होता असं वाटत नाही का? त्यामुळे आता आम्हाला सर्वोच्च न्यायालयाकडून अपेक्षा आहे असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अमित शाह मातोश्रीवर काय सत्यनारायणाच्या पूजेला आले होते?

अमित शाह यांना विचारा शिवसेना कुणाची. पण ज्या देशाच्या गृहमंत्र्याला धाराशिव आणि छत्रपती संभाजी नगर हे नामांतर कुणी केलं ते माहीत नाही. ज्याला शिवसेनेचा प्रमुख कोण माहीत नाही. अमित शाह यांनीच सांगावं मातोश्रीवर २०१९ ला काय सत्यनारायणाच्या पूजेला मातोश्रीवर आले होते का? मला फोन करायचे उद्धवजी तुम्हाला इकडे यायचे, तिकडे यायचे आहे. मला फॉर्म भरुन घेताना कशाला बोलवत होतात? असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारलं.

भाजपा, मिंधे सगळे निर्लज्जं सदा सुखी

भाजपा, मिंधे, ‘या ठिकाणी आणि त्याठिकाणी’ असलेले ते सत्तर हजार कोटीवाले म्हणजे निर्लज्जं सदासुखी आहेत. असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. शिवसेना प्रमुख अनेक शिवसैनिकांना लहान असल्यापासून ओळखत आले आहेत, मी देखील अनेकांना माझ्या लहानपणापासून पाहिलं . आदित्य आणि तेजसही त्यांना काका म्हणत होते. तो माणूस असा फिरतो? असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला. तसंच राहुल नार्वेकरांनी जो निर्णय दिला त्यावर त्यांनी आता प्रश्नचिन्हच उपस्थित केलं आहे.

हे पण वाचा “२०१९ ला अमित शाह मातोश्रीवर सत्यनाराणाच्या पूजेला..”, उद्धव ठाकरेंचा सवाल

राहुल नार्वेकरवर माझा आरोपच आहे की..

माझा त्या लबाडावर आरोप आहे, होय मी राहुल नार्वेकरला लबाडच म्हणणार. कारण शिवसेना कुणाची हे त्याने जरा इथे येऊन पाहावं. हा लबाड आता भाजपाकडून लोकसभेची निवडणूक लढवतो आहे. भाजपाने या लबाड राहुल नार्वेकरला लोकसभेच्या तिकिटाचं लालुच दाखवलं म्हणून तर याने तो निर्णय माझ्याविरोधात दिला नाही ना? माझा तर हा आरोप आहे म्हणूनच त्या लबाडाने तो निर्णय दिला. माझे आमदार, खासदार चोरले असतील पण लोकांचं प्रेम कसं काय चोराल? असा प्रश्न विचारत उद्धव ठाकरेंनी राहुल नार्वेकरांवर आणि भाजपावर गंभीर आरोप केला.