बंड करुन मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या एकनाथ शिंदेंना सत्तेची चटक लागली होती अशी घणाघाती टीका माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केलीय. त्यांना सत्तेची लालसा होती. त्यांना स्वत:ला मुख्यमंत्रीपद हवं होतं, असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. अत्यंत अनपेक्षितरीत्या मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हायला लागल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे प्रथमच जाहीर मुलाखतीद्वारे व्यक्त झाले आहेत. ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली आहे.

नक्की पाहा >> Photos: आता बाळासाहेबांवरुन शिवसेना विरुद्ध मनसे? सूचक विधान करत म्हणाले, “बाळासाहेबांच्या विचारांचा शिवसैनिक आणि राज ठाकरेंच्या…”

उद्धव ठाकरेंनी बंडखोरांनी भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याच्या मुद्द्यावरुन टीका केली. “आधी भाजपासोबत युतीत होतो तर भाजपा त्रास देतेय. भाजपा त्रास देते होती शिवसेनेला खोटं ठरवत होती. आपल्यासोबत ठरवलेल्या गोष्टी नाकार होती म्हणून महाविकास आघाडीला जन्म दिला तर काँग्रेस, राष्ट्रवादीवाले त्रास देत आहेत म्हणायला लागले, मग नेमकं तुम्हाला हवं तरी काय?” असा प्रश्न उद्धव यांनीच विचारला. यावर राऊत यांनी, माझाही हाच प्रश्न आहे की त्यांना नक्की काय हवंय? असं म्हणत उद्धव यांना बंडखोऱ्यांच्या मागण्याबद्दल विचारलं.

Sanjay Shirsat On Shivsena
Sanjay Shirsat : एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंबाबत शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, ‘संधी मिळाल्यास दोन्ही शिवसेना…’
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Deputy Chief Minister Eknath Shinde criticizes Uddhav Thackeray jejuri pune news
ज्यांनी विचार सोडले, त्यांना जनतेने थारा दिला नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
Dhananjay Munde statement that resign if ordered by the party leader
पक्षनेतृत्वाने आदेश दिल्यास पदत्याग! धनंजय मुंडे यांची स्पष्टोक्ती
Hasan Mushrif statement on Kolhapur boundary extension in marathi
कोल्हापूर हद्दवाढीत लोकप्रतिनिधीच आडवे; हसन मुश्रीफ यांचे टीकास्र
Sanjay Shirsat On Thackeray Group
Sanjay Shirsat : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसणार? शिंदे गटाच्या नेत्याचा दावा; म्हणाले, “अर्धे आमदार…”
Sanjay Shirsat On Uddhav Thackeray :
Sanjay Shirsat : “महिन्याभरात राजकारणाला मोठी कलाटणी मिळेल”, संजय शिरसाटांच्या दाव्याने ठाकरे गटात खळबळ; म्हणाले, “सर्व खासदार…”
What Uddhav Thackeray Said?
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी उडवली एकनाथ शिंदेंची खिल्ली, “रुसू बाई रुसू नाहीतर गावात बसू, अशी…”

या प्रश्नावर उत्तर देताना उद्धव यांनी, “त्यांना लालसा आहे. त्यांना स्वत:ला मुख्यमंत्रीपद हवं होतं. ते त्यांनी अत्यंत वाईट पद्धतीने मिळवलं. ही आमची शिवसेना म्हणत शिवसेनाप्रमुखांबरोबर तुलना करु लागले,” असं म्हणाले. यावर राऊत यांनी, “शिवसेनाप्रमुखांशी कधी तुम्ही सुद्धा तुलना केलेली नाही,” अशी प्रतिक्रिया नोंदलवी. “त्यांनी केली पण हे पाहिल्यानंतर मला नाही वाटतं भाजपा कधी पुढे त्यांना स्वत:च्या पक्षात घेतील. नाहीतर ते पुढे कधीतरी नरेंद्रभाईंबरोबर तुलना करायला लागतील स्वत:ची आणि पंतप्रधान पद मागतील,” असा खोचक टोला उद्धव यांनी लगावला.

नक्की वाचा >> Video: “…नाहीतर आमचाच ‘कार्यक्रम’ झाला असता”; गळ्यावरुन हात फिरवत जाहीर कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदेंचं विधान

“लालसा फार घाणेरडी गोष्ट असते. त्याला आपण चटक म्हणू शकतो. मला एका गोष्टीचं समाधान नक्कीच आहे मी अडीच वर्ष मुख्यमंत्री होतो पण मला सत्तेची चटक नाही लागली. सत्तापिपासूपणा एकदा का रक्तात भिनला की तुम्ही कोणाचे नसता आणि कोणी तुमचं नसतं. तेच त्यांचं झालेलं आहे,” अशा शब्दांमध्ये उद्धव यांनी टीका केली. “आमदार गेले आणि आता काही खासदार गेले,” असं म्हणत राऊत यांनी प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. त्यावर उत्तर देताना, “हे गेल्या निवडणुकीमध्ये पडले असते तर काय झालं असतं. हे गेल्या निवडणुकीत पडले असते ते अडीच वर्षांनी पडले असं मी समजतो,” असं माजी मुख्यमंत्री म्हणाले.

नक्की पाहा >> ‘सत्ता होती तेव्हाची’ आणि ‘सत्ता गेल्यानंतर’च्या मुलाखतीमधील फरक दाखवत निलेश राणेंनी सेनेला केलं लक्ष्य; कॅप्शन चर्चेचा विषय

“इतक्या मोठ्या प्रमाणात आमदार फुटतायत किंवा आपल्याला सोडून चाललेत हे जेव्हा चित्र स्पष्ट झालं तेव्हा तुमच्या मनात काय भावना होत्या?” असा प्रश्न राऊत यांनी विचारला. त्यावर उत्तर देताना उद्धव यांनी, “माझ्या मनात हेच आलं की यातले अनेकजण कितीही काही म्हणू दे की मी भेटत नव्हतो. अर्थात शस्त्रक्रीयेनंतर मी हलू शकत नव्हतो तर भेटू काय शकणार होतो? इतर वेळेला हे आमच्या कुटुंबासारखेच होते,” असं उत्तर दिलं.

Story img Loader