Uddhav Thackeray : “अदाणी आमची जान, आम्ही शेठजींचे श्वान या ओळी एकनाथ शिंदेंनी…”; उद्धव ठाकरेंची दसरा मेळाव्यातून बोचरी टीका

Uddhav Thackeray : दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांचं भाषण, एकनाथ शिंदेवर जोरदार टीका

Uddhav Thackeray Speech in Dasara Melava
उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यात जोरदार भाषण करत एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे. (फोटो-शिवसेना, उद्धव ठाकरे शिवसेना )

Uddhav Thackeray : जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, सर्वप्रथम आपल्या सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा देत आहे. आज शस्त्रपूजन आणि सरस्वती पूजन होत असतं. प्रत्येकाकडे वेगळी शस्त्रं असतात. कुणाकडे गन आहे, कुणाकडे अजून काय आहे. आमच्याकडे लढवय्या मन आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले. आम्ही आज शस्त्रपूजा केली त्यात बाकी शस्त्र आहेतच, पण शिवसेना प्रमुखांचा कुंचला त्याची पूजाही आम्ही केली. आता तुम्हा सगळ्यांची पूजा करतो आहे. कारण तुम्ही सगळं शस्त्रं आहेत. एकीकडे अब्दालीसारखी माणसं, यंत्रणा, केंद्रात सत्ता असं सगळं आहे. यांनी मनसुबा आखला की उद्धव ठाकरेंची सेना संपवा. पण ही शिवसेना नाही ही वाघनखं आहेत जी माझ्यासमोर बसली आहेत. असं उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) म्हणाले आहेत. शिवसेना (उद्धव ठाकरे) यांच्या पक्षाचा दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानावर पार पडला. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदेंवर आणि भाजपावर जोरदार टीका केली.

आई जगदंबेसारखे तुम्ही सगळे माझ्यासमोर आहात

आई जगदंबेसारखे तुम्ही सगळे माझ्या बरोबर उभे राहिलात. अब्दालींसारख्याच्या कितीही पिढ्या आल्या तरीही त्यांना गाडून मी त्यावर भगवा फडकवेन कारण मला तुमची साथ आहे. भ्रष्टाचारी सरकारला मशाल चूड लावल्याशिवाय गप्प बसणार नाही असंही उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी म्हटलं आहे.

एकनाथ शिंदेंवर उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

मी बाळासाहेब ठाकरेंचा वारसा सोडलेला नाही. भाजपाला लाथ घातली कारण त्यांचं गोमूत्रधारी हिंदुत्व मला मान्य नाही. मी घेतलेली भूमिका योग्य आहे की अयोग्य. त्यावर सगळे हो म्हणाले. मिंध्यांना सांगा बाळासाहेबांचा विचार हा तुझा विचार नाही. हिंदुत्व आमचा श्वास, मराठी आमचा प्राण अशी जाहिरात मिंध्यांनी दिली आहे. त्याला सांगा पुढच्या दोन ओळी राहिल्या. हिंदुत्व आमचा श्वास, मराठी आमचा प्राण, अदाणी आमची जान आणि आम्ही शेठजींचे श्वान या ओळी राहिल्या. हे सगळे शेपूट हलवणारे आहेत. मी कुत्र्यांचा अपमान करणार नाही. आपण टाटांचंही श्वान प्रेम पाहिलं मी देखील कुत्र्यांवर प्रेम करतो. मी श्वानप्रेमी आहे, पण मी लांडगा प्रेमी नाही. हे सगळे लांडगे आहेत. वाघाचं कातडं पांघरण्याचा प्रयत्न करत आहेत. पण चाललं आहे असं उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) म्हणाले.

हे पण वाचा- Eknath Shinde : “आम्ही घासून-बसून नव्हे तर ठासून…”, दसरा मेळाव्यातून एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना चिमटा

आपल्यासमोरची लढाई म्हणजे महाभारत आहे

आपल्यासमोर असलेली ही लढाई म्हणजे महाभारत आहे, पांडव पाच होते आणि कौरव शंभर. शकुनीमामा कोण तुम्हाला माहीत आहे. सुईच्या अग्रवार मावेल इतकीही जागा तुम्हाला देणार नाही अशी मस्ती कौरवांची होती. भाजपाचीही आज हीच भूमिका आहे. सुईच्या अग्रवार जमीन मावणार नाही पण ती अग्र तुमच्या कुठे टोचेल? आता तर तलवारी आहेत माझ्या समोर आहे. ज्यांनी तुम्हाला संकट काळात साथ दिली, महाराष्ट्रात यांना (भाजपा) कुणी विचारत नव्हतं तेव्हा आम्ही भाजपाला खांद्यावर घेतलं. आज आम्हाला भाजपाला खांदा द्यायचा आहे असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Uddhav thackeray speech in dasara melava he slams eknath shinde in his speech scj

First published on: 12-10-2024 at 20:26 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा
Show comments