आज वरळी येथे ठाकरे गटाचं शिबीर आयोजित केलं आहे. या शिबिरातून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी चौफेर टीका केली. भाजपा नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरही उद्धव ठाकरेंनी जोरदार हल्लाबोल केला. तुम्ही जर खरे सावरकरप्रेमी असाल तर देशाला आपल्या बुडाखाली घेणाऱ्या तुमच्या नेत्यांचा धिक्कार करा. हिंमत असेल तर हे करून दाखवा, असं आव्हान उद्धव ठाकरेंनी दिलं.

खरं तर, काही दिवसांपूर्वी कर्नाटक सरकारने शालेय अभ्यासक्रमातून वीर सावरकरांचा धडा वगळला आहे. यावरून देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. संबंधित प्रकरणावर तुमचं मत काय आहे? असा सवाल फडणवीसांनी विचारला. या विधानावरून उद्धव ठाकरेंनी खरपूस समाचार घेतला आहे.

Uddhav Thackeray and rahul gandhi
इंडिया आघाडीत बिघाडी? विसंवादावरून ठाकरे गटाची काँग्रेसवर तोफ; म्हणाले, “हेवेदावे, जळमटे अन् कुरघोड्यांना…”
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Vijay Wadettiwar On Thackeray group
Vijay Wadettiwar : “आम्ही उद्धव ठाकरेंना विनंती करू, अन्यथा…”, ठाकरे गटाच्या स्वबळाच्या घोषणेवर विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान
Amit Deshmukh On BMC Election 2025
Amit Deshmukh : ठाकरे गटाच्या स्वबळाच्या घोषणेनंतर काँग्रेसची भूमिका काय? अमित देशमुखांचं मोठं भाष्य; म्हणाले, “आम्ही देखील…”
Devendra Fadnavis On Raj Thackeray or Uddhav Thackeray
Devendra Fadnavis : राज ठाकरे की उद्धव ठाकरे? देवेंद्र फडणवीसांनी दिलं राजकीय उत्तर; म्हणाले, “राजकारणात काहीही…”
Vijay Wadettiwar On Devendra Fadnavis
Vijay Wadettiwar : ‘देवेंद्र फडणवीसांनी आता नरेंद्र मोदींचं वारसदार व्हावं’, विजय वडेट्टीवार यांचं मोठं विधान
Sanjay Raut On Municipal Corporation election
Sanjay Raut : मुंबई महापालिकेची निवडणूक ठाकरे गट स्वबळावर लढणार? संजय राऊतांचं मोठं भाष्य; म्हणाले, “दिल्लीत जे घडलं तेच…”
Chandrashekhar Bawankule Answer to Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : “उद्धव ठाकरे अतिविलासी, मातोश्री २ च्या…”, मोदींवर टीका केल्यानंतर भाजपाचं उत्तर

हेही वाचा- “उद्या शिवसेनेचा वर्धापन दिन, परवा जागतिक गद्दार दिन”, उद्धव ठाकरेंचा घणाघात

उद्धव ठाकरे भाषणात म्हणाले, “देवेंद्रजी, तुमची परिस्थिती फार हलाखीची आहे. तुम्ही जे बोलताय, ते ठीक आहे. पण सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही, याचं उत्तम उदाहरण म्हणजे देवेंद्र फडणवीस. कारण त्यांचा होणारा अपमान त्यांना सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही. कारण वरून आदेश आला आहे.”

हेही वाचा- “सुप्रिया सुळे मुख्यमंत्री अन् आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री असतील”, पवार-ठाकरेंच्या प्लॅनबाबत बावनकुळेंचा मोठा दावा

“कर्नाटक सरकारने सावरकरांचा धडा वगळला आहे, याचा शिवसेना निषेध करतेच. सावरकरांनी आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी कष्ट भोगले, म्हणून त्यांना स्वातंत्र्यवीर म्हणतात. सावरकरांनी कष्ट करून, मरण यातना भोगून जो देश स्वातंत्र्य केला, तो देश ज्याचा स्वातंत्र्यसंग्रामात काडीचाही संबंध नव्हता, अशी एखादी विचारधारा तिच्या जोखडाखाली आणू इच्छिते आहे, यावर तुमचं मत काय? सावकरांनी मोदी आणि फडणवीसांसाठी कष्ट आणि हालअपेष्टा भोगल्या होत्या का?” असा सवालही उद्धव ठाकरेंनी विचारला.

हेही वाचा- प्रकाश आंबेडकरांच्या कृतीवर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “संविधानाने त्यांना…”

“देवेंद्र फडणवीसजी, तुम्ही जर खरे सावरकरप्रेमी असाल, तर आपल्या देशाला स्वत:च्या बुडाखाली घेणाऱ्या तुमच्या नेत्यांचा धिक्कार करा. हिंमत असेल तर करून दाखवा. देशाचं स्वातंत्र आणि देशाची लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी आम्ही भाजपा व्यतिरिक्त इतर पक्ष एकत्र येतोय,” असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

Story img Loader