मुंबईतील महापौर बंगला येथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाचे काम सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर या स्मारकाचे सादरीकरण आज ( ५ सप्टेंबर ) करण्यात आलं. स्मारक कसं असेल? कधी पूर्ण होणार? याबद्दल माहिती देण्यात आली. यावेळी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई, शिवसेना आमदार आदित्य ठाकरे, खासदार अरविंद सावंत यावेळी उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

“स्मारकासाठी वेळ लागत आहे, असं काहींना वाटत असेल. पण, स्मारक होत असलेल्या ठिकाणी महापौर बंगला आहे. तो बंगला वारसा असून, त्यासाठी काही नियम असतात. वास्तूच्या मध्ये ( लाईन ऑफ साईट ) एकही बांधकाम करता येत नाही. या वास्तूला धक्का पोहचणार नाही, अशी आम्ही काळजी घेत आहे,” असे उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

हेही वाचा : “राज्यात मध्यावधी निवडणुका लागतील असा उद्धव ठाकरेंचा अंदाज, गुजरातमध्ये…”; अरविंद सावंतांचं विधान

“स्मारकाच्या बांधकामासाठी जागा आहे. पण, सीआरझेडचाही कायदा आहे. या सर्व गोष्टींचा अभ्यास करून आपण प्रेरणास्थानासाठी जमिनीखाली जागा उपलब्ध केली आहे. स्मारकाच्या बाजूला समुद्र आहे. समुद्राच्या पाण्यापासून, पाण्याच्या दबावापासून संरक्षण व्हावे, हे लक्षात घेऊनच बांधकाम करावे लागत आहे. संग्रहालयाला काही धोका पोहोचणार नाही, याचाही विचार करावा लागत आहे,” अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली.

हेही वाचा : “मला तरी कुठे माहिती होतं की मी CM होणार, हा तर…”; शिंदे ‘महाशक्ती’ पाठीशी असल्याचा उल्लेख करत म्हणाले, “स्वत:ची संपत्ती…”

या स्मारकात शिवसेनेचा पहिला नगरसेवक, आमदार आणि मुख्यमंत्र्यांचे फोटो लावण्यात येणार आहेत. याबद्दल प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी उद्धव ठाकरेंना विचारलं. यावर “बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकात शिवसेनेच्याच मुख्यमंत्र्यांचे फोटो असतील. शिवसेनेच्या नावावर तोतयागिरी करणारे नसतील,” असा टोला उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना लगावला आहे.