राज्यातील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. बंडखोरांचं नेतृत्व करणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या गटाने तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाने न्यायालयासमोर युक्तिवाद करताना आपापल्या बाजू मांडल्या. मात्र या युक्तीवादादरम्यान सर्वोच्च न्यायालयाने एका मुद्द्यावरुन शिंदे गटाला खडे बोल सुनावल्याचं पाहायला मिळालं. या सुनावणीदरम्यान एकनाथ शिंदे गटाची बाजू हरीश साळवे मांडत असून आजच्या सुनावणीदरम्यान सुरुवातीला उद्धव ठाकरे गटाची बाजू ज्येष्ठ वकील कपील सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी यांनी मांडली. सुनावणी सुरु असताना विधानसभा अध्यक्षांच्या मुद्द्यावरुन न्यायालयाने शिंदे गटाच्या युक्तीवादावर न्यायालयाने प्रतिप्रश्न केला.
नक्की वाचा >> “भारतात अनेकदा काही नेते, व्यक्ती म्हणजेच पक्ष असं समजण्याची चूक आपण करतो, जर…”; शिंदे गटाचा सर्वोच्च न्यायालयासमोर युक्तिवाद
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा