मनसे नाशिकमध्ये ज्या पध्दतीने काम करीत आहे, त्याची परिणती म्हणून त्या पक्षातून शिवसेनेत नाराजांचे येणे सुरू झाले आहे. यापुढेही हा प्रवाह असाच सुरू राहील, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी केले. रविवारी सायंकाळी मुंबईत ‘मातोश्री’ या ठाकरे यांच्या निवासस्थानी नाशिक येथील मनसेचे नगरसेवक हेमंत गोडसे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी उध्दव ठाकरे बोलत होते. उध्दव यांनी हेमंत गोडसे यांचे शिवसेनेत स्वागत केले. उपस्थित पदाधिकाऱ्यांना एकोप्याने राहण्याचे आवाहन करतानाच निष्ठावंत शिवसैनिक म्हणून सर्वानी काम करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
नाशिकमध्ये मनसेचे कार्य ज्या पध्दतीने सुरू आहे, त्यास कंटाळून आता पक्षातून बाहेर पडणे सुरू झाले आहे. शिवसेनेत येणाऱ्यांचा प्रवाह हा यापुढेही असाच सुरू राहणार आहे, असेही ठाकरे यांनी नमूद केले. यावेळी पक्षाचे स्थानिक नेते उपस्थित होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा