रेणुकादेवी सहकारी सूत गिरणी उभारणीसाठी नाशिक जिल्हा बँकेकडून घेतलेल्या कर्ज रकमेत घोटाळा झाल्याप्रकरणी शिवसेना ( ठाकरे गट ) उपनेते अद्वय हिरे यांच्यावर गुन्हा दाखल होता. त्याप्रकरणी नाशिक पोलिसांनी बुधवारी ( १५ नोव्हेंबर ) अद्वय हिरे यांना भोपाळमधून अटक केली आहे. यावरून शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारला इशारा दिला आहे. ते ‘मातोश्री’ येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

“अद्वय हिरेंच्या पाठिशी संपूर्ण पक्ष आहे. अद्वय हिरेंवर कारवाई केली जाते. पण, आम्ही आरोप करणाऱ्यांची चौकशीही होत नाही. आमचं सरकार आल्यावर सगळ्यांचा हिशोब करणार,” असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला आहे.

Image of Manmohan Singh's sister
Manmohan Singh Death : मनमोहन सिंग यांच्या बहिणीची व्यथा, आजारपणामुळे घेता येणार नाही भावाच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
kalyan municipalitys Rukminibai Hospital show that three people were bitten by stray dog
कल्याणमधील भटक्या श्वानाचे तीन जणांना चावे, भटक्या श्वानांच्या उपद्रवाने नागरिक, शाळकरी विद्यार्थी त्रस्त
Image Of India Alliance Leaders.
AAP vs Congress : “तर काँग्रेसला इंडिया आघाडीतून बाहेर काढायला लावू”; काँग्रेसला भाजपाकडून निधी, आपचे गंभीर आरोप
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : “देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि आकाला..”, संतोष देशमुख हत्याप्रकरणावर काय म्हणाले सुरेश धस?
Image Of Dhananjay Munde
Dhananjay Munde : “माझ्याजवळचा असला तरी सोडू नका”, संतोष देशमुख हत्येप्रकरणी धनंजय मुंडेंकडून फाशीची मागणी

“पराभवाच्या भीतीनं हिरे कुटुंबाविरोधात ४० गुन्हे दाखल”

अद्वय हिरेंच्या अटकेंवरून खासदार संजय राऊतांनी मंत्री दादा भुसेंना लक्ष्य केलं आहे. “अद्वय हिरेंची अटक राजकीय दबावतंत्रातून झाली आहे. त्यांच्यावरील आरोप भाजपात असताना आणि त्याआधीही होते. पण, शिवसेनेत आल्यावर मालेगावात उद्धव ठाकरेंची सभा घेतली आणि मतदारसंघ ढवळून काढला. पराभवाच्या भीतीनं मंत्री महोदयांनी शासकीय यंत्रणेचा गैरवापर करून अद्वय हिरे आणि कुटुंबीयांविरोधात ४० च्याआसपास गुन्हे दाखल केले आहेत,” असं आरोप संजय राऊतांनी दादा भुसेंवर केला.

“दादा भुसेंवर काय कारवाई झाली?”

“गिरणा सहकारी साखर कारखान्याच्या शेअर्समध्ये १७८ कोटींची अफरातफर केल्याचा आरोप दादा भुसेंवर आहे. याबाबत ईडी, सीबीआय यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. मग, दादा भुसेंवर काय कारवाई झाली?” असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, अद्वय हिरेंना पोलिसांनी न्यायालयात हजर केलं होतं. न्यायालायने अद्वय हिरेंना २० नोव्हेंरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Story img Loader