गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील घटकपक्षांमध्ये मतभेद असल्याचं समोर आलं आहे. अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भारतीय उद्योजक गौतम अदाणी यांचं एकप्रकारे समर्थन केलं होतं. हिंडेनबर्ग अहवालातून अदाणींना लक्ष्य केल्याचं दिसत आहे, असं विधान शरद पवारांनी केलं. शरद पवारांच्या या विधानानंतर महाविकास आघाडीमध्ये काहीतरी धुसफूस सुरू असल्याचं समोर आलं.

काँग्रेस आणि ठाकरे गटाने अदाणी प्रकरणी आक्रमक भूमिका घेत जेपीसी चौकशीची मागणी केली होती. पण शरद पवारांनी जेपीसी चौकशीची गरज नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या समितीकडून चौकशी झाली तर योग्य राहिल, असं विधान शरद पवारांनी केलं. यानंतर अलीकडेच ‘एबीपी माझा’ला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांनी ‘फडतूस-काडतूस’ वादावरून उद्धव ठाकरेंसह फडणवीसांचे कान टोचले.

uddhav thackeray emotional appeal impact to voters
उद्धव यांचे भावनिक आवाहन ठाकरे सेनेला कितपत तारणार? मराठवाड्याकडे विशेष लक्ष?
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
raj thackeray latest news
काँग्रेसबरोबर युती करण्यावरून राज ठाकरेंची पुन्हा उद्धव ठाकरेंवर सडकून टीका; म्हणाले, “मी, माझा स्वार्थ, माझी खुर्ची अन्…”
Uddhav Thackeray speech
‘तर मी राजकारणातून निवृत्ती घेईन’, उद्धव ठाकरेंचे छत्रपती संभाजीनगरमध्ये भावनिक आवाहन
Sharad Pawar and Raj Thackeray meeting in Khadakwasla and Hadapsar Constituency
हडपसर, खडकवासला मतदारसंघात पवार ठाकरेंच्या तोफा धडाडणार, एकमेकांना काय उत्तर देणार !
Uddhav Thackeray
कोकणातीन सभेतून उद्धव ठाकरेंचा नारायण राणेंवर हल्लाबोल; दीपक केसरकरांनाही केलं लक्ष्य; म्हणाले…
raj thackeray criticized uddhav thackeray
“उद्धव ठाकरेंच्या हातून पैसा सुटत नाही, बॅगेत काय असणार?” राज ठाकरेंची खोचक टीका!

हेही वाचा- ‘त्या’ विधानांवरून शरद पवारांनी उद्धव ठाकरेंसह फडणवीसांना सुनावलं, म्हणाले…

एवढेच नव्हे तर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास घाई केली. राजीनामा देण्यापूर्वी त्यांनी महाविकास आघाडीतील इतर नेत्यांशी चर्चा केली नाही, असं विधान केलं. त्यामुळे महाविकास आघाडीत सर्वकाही आलबेल नाही, हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं. महाविकास आघाडीमध्ये खदखद सुरू असल्याच्या बातम्याही समोर आल्या.

हेही वाचा- राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार? शिंदे गटाच्या खासदार भावना गवळींचं मोठं विधान; म्हणाल्या, “काही दिवसांत आम्ही…”

या सर्व घडामोडीनंतर महाविकास आघाडीतील दोन मोठ्या नेत्यांची भेट होत आहे. उद्धव ठाकरे हे शरद पवारांच्या निवासस्थानी ‘सिल्व्हर ओक’वर रवाना झाले आहेत. शरद पवारांच्या निवासस्थानी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतही उपस्थित असल्याची माहिती मिळत आहे. या दोन नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.