सध्या उद्धव ठाकरे हे इंडिया आघाडीचा प्रचार करत राज्याच्या विविध भागांचे दौरे करताना दिसत आहेत. इतकंच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आणि भाजपावर जोरदार टीका करतानाही दिसत आहेत. आमचं हिंदुत्व (इंडिया आघाडी) घरातली चूल पेटवणारं आहे आणि भाजपाचं हिंदुत्व घरं पेटवणारं आहे असाही दावा ते आपल्या भाषणांमधून करत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हे वक्तव्य केलं जातं आहे. अशात उद्धव ठाकरेंबाबत एका अपक्ष आमदाराने एक मोठा दावा केला आहे. उद्धव ठाकरे लवकरच पंतप्रधान मोदींना साथ देतील असं या आमदाराने म्हटलं आहे.

एका आमदाराचा मोठा दावा

विधासनभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा देतील असा दावा एका अपक्ष आमदाराने केला आहे. एवढंच नाही तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व उद्धव ठाकरे मान्य करतील असंही या अपक्ष आमदाराने म्हटलं आहे. हे आमदार दुसरे तिसरे कुणी नसून अपक्ष आमदार रवी राणा यांनी उद्धव ठाकरेंना अहंकारी नेता असंही म्हटलं आहे.

Ravindr Dhangkar on Shiv sena :
Ravindr Dhangkar : माजी आमदार रविंद्र धंगेकर शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार? स्पष्टीकरण देत म्हणाले, “मी काँग्रेस पक्षात…”
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Dhananjay Munde statement that resign if ordered by the party leader
पक्षनेतृत्वाने आदेश दिल्यास पदत्याग! धनंजय मुंडे यांची स्पष्टोक्ती
Sanjay Shirsat On Chandrakant Khaire
Sanjay Shirsat : ‘…म्हणून खासदारकीची ऑफर दिली होती’, ठाकरे गटाच्या नेत्याबाबत शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
MLA Ravi Rana On Uddhav Thackeray
Ravi Rana : “उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची छुपी रणनीती”, ‘या’ नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “लवकरच…”
Sanjay Shirsat On Uddhav Thackeray :
Sanjay Shirsat : “महिन्याभरात राजकारणाला मोठी कलाटणी मिळेल”, संजय शिरसाटांच्या दाव्याने ठाकरे गटात खळबळ; म्हणाले, “सर्व खासदार…”
Uday Samant on Eknath Shinde
Sanjay Raut: “एकनाथ शिंदे आता देवेंद्र फडणवीसांना नकोसे, लवकरच मोदींना…”, संजय राऊत यांचा दावा
Aditya Thackeray
“मुख्यमंत्री परदेशात असताना पालकमंत्रिपदांवर स्थगिती…”, आदित्य ठाकरेंना वेगळाच संशय; म्हणाले, “पहिल्यांदाच…”

उद्धव ठाकरे मोदींना भेटण्याच्या प्रयत्नात

महाविकास आघाडी सरकार असताना हनुमान चालीसा मातोश्रीसमोर म्हणणार असं आमदार रवी राणा आणि त्यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा यांनी म्हटलं होतं. त्यावरुन बराच राडा झाला होता, ज्यानंतर या दोघांनाही तुरुंगात डांबण्यात आलं होतं. आता याच रवी राणा यांनी उद्धव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी बेचैन झाले आहेत असं म्हटलं आहे.

हे पण वाचा- भाजपाने महाविकास आघाडीला सुरूंग कसा लावला?

काय म्हटलं आहे रवी राणांनी?

“येणाऱ्या काळात मला विश्वास आहे की विधानसभा निवडणूक होण्याआधी अहंकारी उद्धव ठाकरे हे बेचैन झाले आहेत. मोदींना कधी भेटतो, त्यांची माफी कधी मागतो आणि कधी त्यांना पाठिंबा देतो असं उद्धव ठाकरेंचं झालं आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा विसर त्यांना पडला होता. आता मातोश्रीवर त्याचं चिंतन सुरु आहे. उद्धव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींशी बोलण्याचा प्रयत्न करत आहेत. काही लोकांच्या माध्यमांतून भाजपाशी संपर्क करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करत आहेत. विधानसभेपूर्वी एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व स्वीकारून पंतप्रधान नरेंद्र मोदींना ते पाठिंबा देतील. तसंच काँग्रेसह त्यांनी जी आघाडी केली आहे, राष्ट्रवादीसह जी आघाडी केली आहे त्यांना बाय-बाय करतील. ” असा दावा रवी राणांनी केला आहे.

Story img Loader