सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश धाब्यावर बसून राहुल नार्वेकर यांनी निकाल दिला आहे. राहुल नार्वेकर यांनी निर्लज्जपणाचा कळस गाठला आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसंच शिवसेना कुणाची हा निर्णय त्यांनी दिला. खरंतर महाराष्ट्रातलं लहान मूलही याचं उत्तर देऊ शकतं. पण निर्णय देताना त्यांचा पायाच चुकला आहे कारण निवडणूक आयोगाच्या निकालाचा त्यांनी आधार घेतला असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
शिवसेना संपणार नाही
शिवसेना यांना संपवायची होती. पण शिवसेना काही संपणार नाही. मिंधे किंवा गद्दारांची शिवसेना महाराष्ट्रातली आणि देशाची जनता मान्य करणार नाही. एकनाथ शिंदेंची शिवसेना ही खरी शिवसेना होऊच शकत नाही कारण शिंदे आणि शिवसेना हे नातं तुटलं आहे. असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
आजचा निकाल म्हणजे मिलीभगत
ही सगळी त्यांची मिलिभगत होती. न्यायमूर्तींनी जाऊन आरोपींची भेट घेतली तेव्हाच हा निकाल ठरला होता. पंतप्रधान १२ जानेवारीला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. जर राज्यात अनिश्चिततेचं वातावरण होतं तर पंतप्रधान कसे येणार आहेत? हे (एकनाथ शिंदे) दाव्होसला जाणार आहेत. त्यामुळे तुमची ही सगळी मॅच फिक्स होती असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहे. यांनी (राहुल नार्वेकर) कायद्याप्रमाणे निकालच दिलेला नाही.
हे पण वाचा- “खरी शिवसेना एकनाथ शिंदेंचीच!” उद्धव ठाकरेंना झटका, राहुल नार्वेकरांचा मोठा निर्णय
एकनाथ शिंदे गुलाम आहेत
एकनाथ शिंदे म्हणाले की घराणेशाही मोडीत काढली. यावर विचारलं असता उद्धव ठाकरे म्हणाले, त्यांची प्रतिक्रिया केराच्या टोपलीत टाकण्यासारखीच आहे. जर त्यांना हे वाटत असेल की घराणेशाही त्यांनी मोडून काढली तर मग त्यांची गुलामशाही सुरु झाली आहे. हे गुलाम आहेत असं उद्धव ठाकरेंनी आता म्हटलं आहे.