शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बुधवर ९ जानेवारी रोजी मराठवाडा दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते दुष्काळग्रस्त भागांची पहाणी करणार आहेत. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने हा दौरा महत्वपूर्ण व लक्षवेधी ठरणार आहे. दुष्काळग्रस्त गावांची पाहणी, तेथील शेतकऱ्यांशी संवाद, दुष्काळग्रस्तांना मदत असे उद्धव यांच्या दौऱ्याचे स्वरूप असेल. उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यात शिवसेनेकडून दुष्काळग्रस्तांसाठी मोठी मदत मोहीम राबवली जाणार आहे. या मोहिमेत दुष्काळग्रस्तांना १०० ट्रक पशूखाद्य, धान्य, पिण्यासाठी पाण्याचे टँकर या वस्तूचं वाटप शिवसेनेकडून केलं जाण्याची शक्यता आहे. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेही १२ जानेवारीपासून दुष्काळी भागाच्या पाहणीस जाणार आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा