काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे सत्तेच्या स्वार्थासाठी एकत्र आलेले पक्ष म्हणूनच त्यांची साथ सगळे सोडत आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी ही स्वार्थापोटी एक झाले आहेत अशी टीका उदयनराजे भोसले यांनी केली. शंभूराजे देसाई यांच्या प्रचारासाठी झालेल्या सभेत उदयनराजे भोसले बोलत होते. आम्ही विचारांनी एकत्र आलेलो आहोत त्यामुळे आमचीच म्हणजेच शिवसेना भाजपा महायुतीचीच सत्ता येणार असाही विश्वास उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विरोधकांच्या भाषणात आजही अहंकार दिसतो. महापुरुषांचे विचारही काँग्रेस विसरली. शिवाजी महाराजांच्या विचारांचा विसर यांना पडला एवढंच नाही तर महात्मा गांधी यांच्या विचारांचाही काँग्रेसला जपता आला नाही अशीही टीका उदयनराजे भोसले यांनी केली. आपल्या भाषणात त्यांनी श्रीनिवास पाटील यांचं नाव न घेता टोला लगावला. श्रीनिवास पाटील म्हणतात तरुणांना संधी दिली पाहिजे आणि मागणी करतात उमेदवारी मलाच हवी. त्यानंतर मी आरशात पाहणंच सोडून दिलं असं म्हणत त्यांनी श्रीनिवास पाटील यांची खिल्ली उडवली.

आदित्य ठाकरे हे तरुणांच्या गळ्यातले ताईत आहेत असं म्हणत उदयनराजे भोसले यांनी त्यांचंही कौतुक केलं आहे. आम्ही विचारांनी एकत्र आलेली माणसं आहोत. त्यामुळे कायमस्वरुपी एकत्र राहू, आमच्या एकत्र येण्यामागे कोणताही स्वार्थ नाही असंही उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे. स्वार्थापोटी काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र आले होते. त्यामुळेच १५ वर्षात ते जनतेचं काहीही भलं करु शकलं नाही. त्यांचे विचारही वेगळे आहेत, ते स्वार्थापोटी एकत्र आल्याने त्यांची वाताहात झाली. हे दोन्ही पक्ष विचारांनी बांधलेले नाहीत.

मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होतो तेव्हा माझी अवस्था त्यांच्यासाठी पिंडीवरच्या विंचवासारखी होती. मला मारताही येत नव्हतं आणि हाकलताही येत नव्हतं. म्हणून मी राष्ट्रवादीतून बाहेर पडलो. जनतारुपी महादेव माझ्यासोबत आहे. मी कशालाही घाबरत नाही माझं तोंड कुणीही बंद करु शकत नाही असंही उदयनराजे यांनी भाषणात स्पष्ट केलं.

 

 

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Udhayan raje bhosle criticized congress and ncp in his speech scj
Show comments