लोकसत्ता प्रतिनिधी

सोलापूर : जिल्ह्यासाठी वरदान असलेल्या उजनी धरणात सह्याद्री घाटमाथ्यासह भीमा खोऱ्यात पडणाऱ्या जोरदार पावसामुळे पाणीसाठा झपाट्याने भरत आहे. धरण आता शंभर टक्के पाणीसाठ्याच्या दिशेने वाटचाल करू लागले आहे. येत्या दोन दिवसांत धरण शंभर टक्के भरण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Union Carbide waste disposal issue
‘युनियन कार्बाईड’च्या कचऱ्याचा प्रश्न उग्र का झाला? हा कचरा मूळ वायूइतकाच अतिधोकादायक? दुर्घटनेची शक्यता किती?
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
imd predicted possibility unseasonal rains in maharashtra
राज्यावर पुन्हा अवकाळीचे संकट! ; हवामान खाते…
Ujani Dam, Ujani Dam Agriculture Water ,
उजनीतून एप्रिलपर्यंत शेतीसाठी पाण्याची तीन आवर्तने, पहिल्या आवर्तनासाठी १४.१७ टीएमसी पाणी
delhi fog flights stuck
दिल्लीत धुक्याची चादर, दृश्यमानता शून्यावर, १०० विमानांचा खोळंबा
Work on direct water pipeline from Gangapur Dam begins
गंगापूर धरणातून थेट जलवाहिनीचे काम प्रारंभ, नाशिकचा तीन दशकांचा प्रश्न मार्गी लागणार
Vidarbha lowest temperature winter
विदर्भात सर्वाधिक कमी तापमानाची नोंद
north-south winds Temperature increase December winter
गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत यंदाच्या डिसेंबरमध्ये तापमानवाढ; उत्तर-दक्षिणेकडून येणाऱ्या वाऱ्यांचा परिणाम

शनिवारी सायंकाळी सहापर्यंत धरणात एकूण पाणीसाठा १०५.४९ टीएमसी अर्थात उपयुक्त पाणीसाठा ४१.७८ टीएमसी म्हणजे ७७.९९ टक्के होता. रात्रीपर्यंत धरणाची वाटचाल ८० टक्के भरण्याच्या दिशेने सुरू होती.

आणखी वाचा-Mumbai Crime : मुलाचं विमानाचं तिकिट काढलं, नातेवाईकाला बँकेची माहिती दिली; पत्नीची हत्या करून पती…; गोरेगावात खळबळ!

दरम्यान, पुण्यातील बंडगार्डनसह दौंड येथून उजनी धरणात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग प्रचंड वाढल्यामुळे येत्या दोन दिवसांत धरण शंभर टक्के भरण्याची चिन्हे दिसत आहेत. दरम्यान, धरण शंभर टक्के पाणीसाठ्याकडे वाटचाल करू लागल्यामुळे जलसंपदा विभागाने धरणातून येत्या ५ ऑगस्टपासून मुख्य कालव्यात तीन हजार क्युसेक विसर्गाने पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे धरणावरील जलविद्युत निर्मिती प्रकल्पही सुरू करण्याच्या हालचाली वाढल्या आहेत.

शनिवारी सकाळी सहापर्यंत उजनी धरण ७२.१९ टक्के भरले होते. त्यात १२ तासांत ६ टक्क्यांनी वाढ झाली. धरणात दौंड येथून येऊन मिसळणाऱ्या पाण्याचा विसर्ग आणखी वाढविण्यात येऊन तो ६८ हजार ६०० क्युसेक करण्यात आला होता. तर बंडगार्डन परिसरातून दौंडच्या दिशेने येणाऱ्या पाण्याचा विसर्गही ४८ हजार ८८७ क्युसेकपर्यंत वाढविण्यात आला होता.

Story img Loader