बदलापूर या ठिकाणी दोन मुलींवर अत्याचार झाला. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. अशात या प्रकरणाची विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात येईल असं सरकारतर्फे सांगण्यात आलं. ज्यानंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उज्ज्वल निकम ( Ujjwal Nikam ) यांना हे प्रकरण देऊ नये असं म्हटलं होतं. तसंच संजय राऊत आणि सुषमा अंधारे या दोघांनीही या प्रकरणात उज्ज्वल निकम यांची नियुक्ती नको ते आता भाजपाचे झाले आहेत असं म्हणत टीका केली. त्यावर आता उज्ज्वल निकम यांनी उत्तर दिलं आहे. उज्जवल निकम ( Ujjwal Nikam ) यांनी जर हे प्रकरण हाती घेतलं तर पीडितेला न्याय मिळणार नाही असा आरोप विरोधकांनी केला आहे. मात्र विरोधकांच्या आरोपांना निकम यांनी उत्तर दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले उज्ज्वल निकम?

“मी निवडणूक लढलो आहे हे मान्य आहे. राजकीय पक्षाकडून निवडणूक लढलो आहे. काँग्रेसच्या पक्षाचे दिग्गज वकील अतिरेक्यांचं वकीलपत्र घेतात. १९९३ चा खटला मी चालवत होतो, त्यावेळी काँग्रेस पक्षाचे नेते कुणाला वाचवण्यासाठी आटापिटा करत होते, कोणत्या अभिनेत्याला वाचवण्याचा प्रयत्न झाला हे मला आणि महाराष्ट्राला माहीत आहे. माझ्याकडे अशा बऱ्याच गोष्टी आहेत.” असं म्हणत उज्ज्वल निकम ( Ujjwal Nikam ) यांनी विरोधकांना उत्तर दिलं.

हे पण वाचा- Ajit Pawar : “असा दरारा निर्माण झाला पाहिजे की पुन्हा…”, बदलापूरच्या घटनेवर अजित पवारांनी मांडली भूमिका

बदलापूर प्रकरणावर काय म्हणाले उज्ज्वल निकम?

बदलापूर आणि पॉक्सो कायद्याबाबत उज्ज्वल निकम ( Ujjwal Nikam ) म्हणाले की पॉक्सो कायद्याच्या अंतर्गत अधिनियम करावा लागतील. शक्ती विधेयकायचं कायद्यात रुपांतर होणं आवश्यक आहे. माझीच नियुक्ती करण्यात आली त्याचा विरोधकांना त्रास होतो आहे.बदलापूर प्रकरणात जे आंदोलन झालं, तसंच जो रेलरोको झाला ती लोकांची प्रतिक्रिया होती. जे घडलं ते अत्यंत घृणास्पद आहे. फाशीची मागणी झाली आहे. लोकांची उत्स्फुर्त प्रतिक्रिया होती. कायदेशीर प्रक्रियेने आपल्याला पुढे जावं लागतं. माझं आणि देवेंद्र फडणवीस यांचं बोलणं झालं आहे. अधिकृत रित्या मला वकीलपत्र देण्यात आलेलं नाही. मात्र या प्रकरणात मी लक्ष घालावं असं देवेंद्र फडणवीस यांनी मला सांगितलं आहे असंही उज्ज्वल निकम ( Ujjwal Nikam ) म्हणाले.

उज्ज्वल निकम म्हणाले, “जीभेला हाड नसतं असं म्हणतात, पण हाड नसलं तरीही बेछुट आणि बेताल आरोप ते प्रसिद्ध आहेत. हेमंत करकरेंचा मृत्यू अजमल आमिर कसाब आणि इतर दहशतवाद्यांच्या गोळीबारात झाला हे सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं तरीही त्यावर ते प्रश्न उपस्थित करणारे नेते आहेत.” असं उज्ज्वल निकम म्हणाले आहेत. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत उज्ज्वल निकम यांनी हे उत्तर दिलं आहे. आरोपी कुठल्याही पक्षाचा असो त्याला कठोरातली कठोर शिक्षा होईल अशी ग्वाही मी देतो असं म्हणत उज्ज्वल निकम यांनी विरोधकांचे आरोप खोडून काढले आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ujjwal nikam gave answer to opposition leaders about badlapaur case scj