बदलापूर शाळा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत मृत्यू झाला आहे. त्याच्या मृत्यूनंतर आता विविध चर्चांना उधाण आलं आहे. यावरून विरोधकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. तर पोलिसांनी स्वरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे. दरम्यान, या प्रकरणावर आता विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. उज्वल निकम यांनी नुकताच टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी याप्रकरणावर भाष्य केलं.

नेमकं काय म्हणाले उज्वल निकम?

“अक्षय शिंदे याचा मृत्यू पोलिसांनी स्वरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात झाला की त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला आणि त्यातून झालेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला, यासंदर्भात तपशीलवार माहिती उपलब्ध नाही. पण एक गोष्ट निश्चित आहे, हे प्रकरण गंभीर आहे. आरोपीचा मृत्यू हा न्यायालयीन कोठडीत असताना झाला आहे, त्यातही तो गोळीबारात ठार झाला आहे, त्यामुळे या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी नक्कीच होईल”, अशी प्रतिक्रिया विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी दिली.

atul subhash
Atul Subhash Suicide Case : अतुल सुभाषच्या सासू आणि मेव्हण्याने केलं पलायन; पोलीस म्हणतात, “त्यांना नजरकैदेत…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Two youths attacked with a koyta in Khadki crime news Pune news
पुणे: खडकीत दोघा तरुणांवर कोयत्याने वार
justice shekhar yadav controversial statement
अन्वयार्थ : ‘सांविधानिक भावना दुखावण्या’पल्याड…
Bajrang Sonwane meets Amit Shah
“बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सीआयडी चौकशी व्हावी”; शरद पवारांचा खासदार थेट अमित शाहांना भेटला
Muramba
Video: शिवानी मुंढेकरचा मॉर्डन लूक व ‘या’ अभिनेत्याची होणार एन्ट्री; पाहा ‘मुरांबा’ मालिकेचा नवीन प्रोमो
Santosh Deshmukh Murder Case
“…म्हणून माझ्यावर ही वेळ आली का?” मयत सरपंच संतोष देशमुखांच्या आईचा टाहो; पत्नी म्हणाली, “ते १५ वर्षांपासून..”
Eknath Shinde On Maharashtra Karnataka Border Dispute :
Eknath Shinde : “कर्नाटक सरकारचा दडपशाहीचा प्रयत्न”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुनावलं

हेही वाचा – बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण : आरोपी अक्षय शिंदेच्या मृत्यू प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

“आज जी माहिती उपब्लध आहे, त्यानुसार आरोपीने पोलिसांजवळचे शस्त्र हिसकावून त्यांच्यावर गोळीबार केला आहे. पण याची सत्यता किती आहे, हे न्यायालयीन चौकशीत पुढं येईल. तसेच पोलिसांनी स्वत:कडे असलेली बंदूक लॉक केली होती का? आरोपीला हातकडी लावण्यात आली होती का? ही बाब तपासली जाईल, असेही ते म्हणाले. पुढे बोलताना, एन्काऊंटर होणं हे केव्हाही वाईट आहे. परंतु पोलिसांना कोणत्या परिस्थितीत गोळीबार करावा लागला याची निश्चितपणे चौकशी होईल, यात कोणी दोषी आढळलं तर त्यांच्यावर कठोर कारवाईची शक्यताही नाकारता येत नाही”, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

नेमकं काय घडलं?

काही दिवसांपूर्वीच बदलापूर येथील एका शाळेत दोन चिमुकल्या विद्यार्थिनीवर अत्याचार झाल्याचे प्रकरण समोर आले होते. या घटनेनंतर बदलापूरमध्ये नागरिकांनी रेल्वे रुळावर उतरून आंदोलन केले होते. या आंदोलनामुळे तणावाचे वातावरण होते. त्यानंतर अक्षय शिंदे याला अटकही करण्यात आली होती. या आंदोलनाची दखल घेत राज्य शासनाने या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी नेमली होती. या एसआयटीच्या टीमने या प्रकरणाचा तपास करून कल्याण न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.

हेही वाचा – बदलापूर शाळा लैंगिक अत्याचार प्रकरण : आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांवर गोळीबार; अक्षय चकमकीत ठार

अशातच अक्षय शिंदे याच्या दुसऱ्या पत्नीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी त्याच्या विरोधात अनैसर्गिक लैंगिक संबंध प्रस्थापित केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी ठाणे पोलिसांच्या क्राईम ब्रॉंच टीमने त्याला ताब्यात घेतले होते. सोमवारी सायंकाळी पोलीस त्याला तळोजा कारागृहातून चौकशीसाठी घेऊन जात असताना त्याने पोलीस अधिकाऱ्याची बंदूक हिसकावून त्यांच्यावर गोळ्या झाडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ अक्षयवर गोळीबार केला यात तो ठार झाला.

Story img Loader