रत्नागिरी : रत्नागिरी शहरापासून जवळच असणाऱ्या मिरकवाडा जेटीवरील अनधिकृत बांधकामांवर जिल्हा प्रशासनाकडून लवकर हातोडा चालविण्यात येणार आहे. मात्र त्या आधी या ३१९ पेक्षा जास्त असणाऱ्या अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना ही बांधकामे तोडण्याची नोटीस मत्स्य व्यवसाय विभागाच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

रत्नागिरीतील मिरकरवाडा जेटीच्या सुमारे अकरा हेक्टर जागेवर कोट्यवधी रुपये खर्च करून हे बंदर विकसित केले जाणार आहे. यासाठी मत्स्य विभागाकडून हालचालीना वेग आला आहे. मात्र या जेटी परिसरात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे करण्यात आली आहेत. याबरोबर माशांची जाळी, नौकांचे सामान, सुके मासे आणि खारवून ठेवलेले मासे या सारख्याने हा भाग व्यापलेली आहे. आतापर्यत या जेटी परिसरात सुमारे ३१९ पेक्षा जास्त अनधिकृत बांधकामे उभी करण्यात आली असून, ती तत्काळ तोडण्याची नोटीस मत्स्य विभागाने दिली आहे. तसे न केल्यास या सर्व बांधकांवर जिल्हा प्रशासनाने हातोडा चालविण्याची तयारी दर्शविली आहे.

आणखी वाचा-Sadabhau Khot : “…म्हणून मंत्रि‍पदाची काही अपेक्षा नव्हती”, आमदार सदाभाऊ खोत यांचं महत्वाचं विधान

मिरकरवाडा जेटीच्या विकासासाठी ११ हेक्टर जागेवर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येणार असून या जेटीमध्ये ३०० ट्रॉलर्स आणि २०० पर्ससीन मच्छीमारी नौका अशा एकूण ५०० नौका उभ्या राहण्यासाठी सुसज्ज बंदर येथे उभारण्यात येणार आहे. या कामासाठी राज्य शासनाने निधीही मंजूर केला आहे.

मिरकरवाडा जेटीवरील अनधिकृत बांधकामांना अनेकदा नोटीस बजावण्यात आली होती. या नोटीसीनंतर ऑक्टोबर २०२३ मध्ये मिरकरवाडा जेटीवरील अनधिकृत बांधकामे तोडण्यात आली होती. ही कारवाई मत्स्यविभाग, पालिका यांच्याकडून पोलीस संरक्षणात करण्यात आली होती. मात्र पुन्हा ही अनधिकृत बांधकामे तोडण्याची कारवाई लवकर करण्यात येणार आहे.

आणखी वाचा-Uday Samant : उद्धव ठाकरेंना धक्का बसणार? शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “पुढच्या आठ दिवसांत ठाकरे गटातून…”

मिरकरवाडा जेटीवरील अनधिकृत बांधकामाविरूद्ध अनेकदा नोटीसा देऊनही डोळे झाक करण्यात आले आहे. त्यामुळे आता ही बांधकामे तोडून जागा तत्काळ खाली करा, अशी नोटीस मत्स्य विभागाकडून देण्यात आली आहे. मात्र यासाठी वेळेची मुदत देवून सर्व अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करून जागा रिकामी करण्यात येणार आहे. -आनंद पालव, सहाय्यक मत्स्य आयुक्त रत्नागिरी</strong>

Story img Loader