सांगली : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातील ३ हजार ३२२ घरकुलांना मंजुरी मिळाली असून, कडेगाव तालुक्यातील २०४४ तर पलूस तालुक्यातील १२७८ जणांचे घरांचे स्वप्न साकार होणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी दिली.
मंजूर करण्याात आलेल्या घरकुल प्रस्तावामध्ये कडेगाव तालुक्यातील अमरापूर, अंबक, आंबेगाव, अपशिंगे, आसद, बेलवडे, भिकवडी खुर्द, बोंबाळेवाडी, चिखली, चिंचणी, देवराष्ट्रे, ढाणेवाडी, हनमंतवडीये, हिंगणगाव बुद्रुक, हिंगणगाव खुर्द, कडेपूर, कान्हारवाडी, करांडेवाडी, खंबाळे औंध, खेराडे वांगी, खेराडे विटा, कोतवडे, कोतीज, कुंभारगाव , मोहिते वडगाव, नेर्ली, नेवरी, निमसोड, पाडळी, रायगाव, रामापूर, रेणुशेवाडी, सासपडे, शाळगाव, शेळकबाव, शिरसगाव, शिरगाव, शिवाजीनगर, शिवणी, सोहोली, सोनकिरे, सोनसळ, तडसर, तोंडोली, तुपेवाडी, उपाळे वांगी, उपाळे मायणी, वडीयेरायबाग, वाजेगांव, विहापूर, वांगी, येडे, येतगाव, येवलेवाडी आदी गावांतील २ हजार ४४ तर पलूस तालुक्यातील तुपारी, दह्यारी, दुधोंडी, घोगाव, पुणदी, पुणदीवाडी, नागराळे, रामानंदनगर, सावंतपूर, कुंडल, आंधळी, मोराळे, सांडगेवाडी, बांबवडे, बुर्ली, आमणापूर, विठ्ठलवाडी, धनगाव, बुरुंगवाडी, हजारवाडी, भिलवडी स्टेशन, खंडोबाचीवाडी, माळवाडी, भिलवडी, चोपडेवाडी, सुखवाडी, ब्रह्मनाळ, खटाव, अंकलखोप, राडेवाडी, खोलेवाडी, नागठाणे, वसगडे या गावांतील १ हजार २७८ लाभार्थींना घरकुले मंजूर करण्यात आली आहेत. पहिल्या टप्प्यात लाभार्थींच्या बँक खात्यात १ लाख २० हजार रुपये जमा करण्यात येत असल्याचेही सांगण्यात आले.