सागरी किनारा सुरक्षेबाबत कोकण विभागातील पोलिस अधिकाऱ्यांची लवकरच बैठक

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोकण किनाऱ्यावरील सागरी सुरक्षा तसेच पर्यटकांच्या सुरक्षेबाबत उपाय योजनेसाठी कोकण विभागातील पाच जिल्ह्यातील जिल्हा पोलिस प्रमुख, विभागाचे पोलिस उप महानिरीक्षक, पोलिस महासंचालक, विशेष पोलिस महानिरीक्षक यांची लवकरच बठक घेण्यात येईल अशी माहिती गृह राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी येथे दिली.

शासन व लोकसहभागातून सुमारे पाच लक्ष रुपये खर्च करुन बांधण्यात आलेल्या शॉर्ट आर्म सेमी अंडर ग्राउंड फायिरग रेंजचे उद्घाटन श्री. केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. राज्यात अशा प्रकारचे पहिलेच फायिरग रेंज सिंधुदुर्गनगरीयेथील पोलिस मुख्यालयात उभारण्यात आले आहे. यावेळी व्यासपीठावर जिल्हा पोलिस प्रमुख दीक्षीतकुमार गेडाम, जिल्हाधिकारी उदय चौधरी, अप्पर पोलिस अधिक्षक प्रकाश गायकवाड उपस्थित होते.

सागरी सुरक्षा महत्त्वाची आहे. याचबरोबर पर्यटकांच्या सुरक्षेबाबतही पोलिस विभागामार्फत काय उपाय-योजना करता येतील याचा या बठकीत विचार केला जाईल असे स्पष्ट करुन पालकमंत्री श्री. केसरकर म्हणाले की, पोलिस कर्मचाऱ्यांना गृह कर्जात व्याज सवलतीसाठी २९ कोटी रुपयांची तरदूत करण्यात आली आहे.  पोलिस कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी कोकण विभाग पातळीवर मेळावे आयोजित करण्याचे नियोजन आहे. ते म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यत विशेषत: महिला अत्याचार किंवा महिलांवरील गुन्ह्य़ााचे प्रमाण कमी व्हावे यासाठी जिल्ह्यातील पोलिस विभागाने परिश्रम घ्यावेत. क्राईम रेट शुन्य ही संकल्पना साकारण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत पोलिस विभागाने सी.सी.टी.व्ही तसेच त्यांना आवश्यक असलेल्या निधी बाबत जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव सादर करावेत त्यांना विशेष निधी देण्याचा प्रयत्न करु.

यावेळी जिल्हाधिकारी उदय चौधरी म्हणाले की, माजी जिल्हा पोलिस प्रमुख दत्तात्रय शिदे यांनी २० लाख रुपयांचा हा फायिरग रेंज प्रकल्प लोकसहभाग, पोलिस कर्मचाऱ्यांचे श्रमदान तसेच शासन निधीयांद्वारे अवघ्या पाच लाख रुपयांमध्ये पूर्ण केला व मुख्यालयातच फायिरग सुविधेची सोय केली. शासनाच्या निधीची बचत केल्याबद्धल ते अभिनंदनास पात्र आहेत. जिल्हा पोलिस प्रमुख दीक्षीतकुमार गेडाम म्हणाले की, राज्यात प्रथमच अशा प्रकारचे अंडर ग्राउंड फायिरग रेंज सिंधुदुर्गात होत आहे. पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना फायिरग सरावासाठी पूर्वी कुडाळला जाव लागायच आता ही फायिरग रेंजची सुविधा मुख्यालयातच होण्याबरोबर दिवस-रात्र चौविस तास या फायिरग रेंज सुविधेचा लाभ होणार आहे.  प्रारंभी पोलिस निरीक्षक विश्वजित कांईगडे यांनी स्वागत केल तर शेवटी होम डी.वाय.एस.पी. श्रीमती गावडे यांनी आभार मानले.  समारंभास जि.प. सदस्य संजय पडते, तसेच पोलिस दलातील अधिकारी व कर्मचारी व पत्रकार उपस्थित होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Underground firing range at sindhudurg district
Show comments