Petrol And Diesel Rates Declared On The Day Union Budget 2025 : आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. याचनिमित्त महागाई कमी होईल आणि टॅक्समध्ये थोडीफार सवलत मिळेल अशी अपेक्षा आज प्रत्येक सर्वसामान्यांची असेल. तर अर्थसंकल्पात पेट्रोल व डिझेलच्या किंमतीत घट होणार की पूर्वीपेक्षा इंधनाची किंमत आणखीन वाढणार हे पाहणे आता रंजक ठरणार आहे. तर आज सकाळी ६ वाजता पेट्रोल व डिझेलचे दर जाहीर झाले आहेत. तुमच्या शहरांत एक लिटर इंधनाची किंमत काय असेल ते तुम्ही खाली दिलेल्या तक्त्यात तपासून घ्या
पेट्रोल-डिझेलचा महाराष्ट्रातील आजचा दर (Petrol Diesel Rate Today)
शहर | पेट्रोल (प्रति लिटर ) | डिझेल (प्रति लिटर ) |
अहमदनगर | १०४.८९ | ९१.४० |
अकोला | १०४.११ | ९०.६८ |
अमरावती | १०५.१६ | ९१.६९ |
औरंगाबाद | १०५.५० | ९२.०३ |
भंडारा | १०४.८८ | ९१.४१ |
बीड | १०४.८२ | ९१.३३ |
बुलढाणा | १०५.३८ | ९१.९० |
चंद्रपूर | १०४.४६ | ९१.०२ |
धुळे | १०४.५७ | ९१.१० |
गडचिरोली | १०४.२४ | ९१.७७ |
गोंदिया | १०५.४४ | ९१.९५ |
हिंगोली | १०५.५० | ९२.०३ |
जळगाव | १०५.७२ | ९१.२३ |
जालना | १०५.३० | ९२.०३ |
कोल्हापूर | १०४.०९ | ९०.६६ |
लातूर | १०५.३२ | ९१.८३ |
मुंबई शहर | १०३.५० | ९०.०३ |
नागपूर | १०४.०९ | ९०.६५ |
नांदेड | १०५.५० | ९२.०३ |
नंदुरबार | १०४.९७ | ९१.४८ |
नाशिक | १०४.५४ | ९१.०६ |
उस्मानाबाद | १०४.९१ | ९१.४३ |
पालघर | १०४.२३ | ९०.७३ |
परभणी | १०५.५० | ९२.०३ |
पुणे | १०४.०१ | ९०.५४ |
रायगड | १०३.७८ | ९०.३० |
रत्नागिरी | १०३.७८ | ९१.९६ |
सांगली | १०४.२३ | ९०.७९ |
सातारा | १०४.७२ | ९१.२५ |
सिंधुदुर्ग | १०५.५० | ९२.०३ |
सोलापूर | १०४.७३ | ९१.२६ |
ठाणे | १०३.६८ | ९०.२० |
वर्धा | १०४.९१ | ९१.४४ |
वाशिम | १०४.९५ | ९१.४८ |
यवतमाळ | १०५.५० | ९२.०३ |
उत्पादन शुल्कात कपात केल्यास पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होऊ शकतात. सध्या पेट्रोलवर १९.९० रुपये आणि डिझेलवर १५.८० रुपये शुल्क आहे. त्यामुळे अर्थसंकल्प २०२५ मध्ये होणाऱ्या घोषणांकडे सर्वसामान्यांचे लक्ष आहे. अकोला, गडचिरोली, गोंदिया, कोल्हापूर, उस्मानाबाद आदी शहरांत डिझेल तर बीड, कोल्हापूर, पुणे या शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती किंचित घट तर महाराष्ट्रातील अनेक शहरांत पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ झालेली दिसते आहे.
एसएमएसद्वारे जाणून घ्या दर :
देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या नवीन किंमती जाहीर करण्यात आल्या आहेत. कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतींनुसार भारतात इंधनाची किंमत ठरवली जाते. तर तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. यासाठी तुम्ही इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतो.
कारला अंडरबॉडीचे प्रकार –
एखादी गाडी खरेदी केल्यावर त्याची सुरक्षा कशी करायची हा प्रश्न पडतो. तर अंडरबॉडी कोटिंग (Underbody coating) ही एक कार केअर प्रोटेक्टर्सपैकी एक आहे. त्यासाठी वाहनाच्या खालच्या बाजूस एक संरक्षक थर लावला जातो, जो ओलावा, मोडतोड, गंज आणि इतर बाह्य नुकसानांपासून वाहनाचे संरक्षण करतो. तर या लेखात आपण अंडरबॉडी कोटिंगचे प्रकार जाणून घेणार आहोत. बाजारात अनेक प्रकारचे अंडरबॉडी कोटिंग्स उपलब्ध आहेत आणि प्रत्येक कोटिंगचे वेगवगेळे फायदे, महत्त्व आहे. कारमालक त्यांच्या गरजांनुसार अंडरबॉडी कोटिंगपैकी कोणताही एक प्रकार निवडू शकतात.
१. वॅक्स-बेस कोटिंग्स
वॅक्स-बेस कोटिंग्स अनेक कोटमध्ये (लेयर) लावले जाते. त्यामुळे वाहनाचे इतर अंडरबॉडी कोटिंगप्रमाणेच ओलावा, गंज आणि इतर बाह्य नुकसानांपासून चांगले संरक्षण होते. इतर कोटिंगच्या तुलनेत हे कटिंग स्वस्त आहे.
२. रबर-बेस कोटिंग्स
रबर-बेस कोटिंग्स वाहनांना जाड; पण अधिक टिकाऊ संरक्षण प्रदान करतात. हे कोटिंग्स रसायने आणि घर्षणापासून वाहनाचे संरक्षण करतात, ज्यामुळे हवामान किंवा तीव्र उष्णतेच्या संपर्कात येणाऱ्या वाहनांसाठी योग्य ठरू शकतात.
३. स्प्रे-ऑन लाइनर्स
स्प्रे-ऑन लायनर्स, ॲस्फाल्ट अंडरबॉडी कोटिंग म्हणून ओळखले जाते, या प्रकारचे कोटिंग जाड, टेक्श्चर लेयर म्हणून लागू केले जाते आणि दगड, ओरखड्यांपासून वाहनाचे संरक्षण होते. ते सामान्यतः बस, व्हॅन, ट्रक इत्यादींवर वापरले जातात.
४. पॉलीयुरेथेन कोटिंग्स
या प्रकारातील कोटिंग धातूच्या पृष्ठभागांना चांगले चिकटते. पॉलीयुरेथेन कोटिंग वाहनाचे ओरखडे आणि रसायनांपासून संरक्षण करण्यास मदत करतात.