विश्वास पवार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाई:उपमुख्यमंत्री अजित पवार महायुतीमध्ये सामील झाल्यामुळे भाजपला काहीही फरक पडणार नाही .राज्यात भाजप हाच सर्वात मोठा पक्ष आहे ते महायुतीत आल्यामुळे प्रादेशिक स्वरूपाच्या छोट्या-मोठ्या पक्षांना फरक पडेल असे उपरोधीकपणे साताऱ्याचे संपर्क प्रभारी व केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा साताऱ्यात म्हणाले. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा साताऱ्याच्या भाजपा संपर्क अभियानावर होते.बुधवारी दिवसभराच्या भेटी,बैठकां नंतर ते साताऱ्यात पत्रकारांशी बोलत होते.यावेळी खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, सातारा जिल्ह्याचे प्रभारी अमर साबळे अतुल भोसले मनोज घोरपडे भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम शहराध्यक्ष विकास गोसावी सचिव विठ्ठल बलशेठवार उपस्थित होते.

हेही वाचा >>> सोयाबीनवर ‘यलो मोझॅक व्हायरस’, शेतकरी चिंतेत, उत्पादनात घट होण्याची भीती

भाजपा हा राज्यातील एकमेव सर्वात मोठा पक्ष आहे.पक्षाचे १८ कोटी सदस्य आहेत. पक्षाची ध्येय धोरणे आणि संघटनात्मक कामे वरिष्ठ केंद्रीय कार्यकारणीच्या माध्यमातून योग्य पद्धतीने सुरू आहेत असे सांगून अजय कुमार मिश्रा म्हणाले,महाराष्ट्रामध्ये आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदारकीच्या सर्व ४८ जागा निवडून आणणार आहे. त्याकरिता भाजपची संघटनात्मक बांधणी अत्यंत योग्य पद्धतीने सुरू आहे. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला आरक्षण, विश्वकर्मा योजना या विविध विकास योजनांच्या माध्यमातून देशाला एका वेगळ्या पातळीवर नेले आहे असे मिश्रा म्हणाले.

हेही वाचा >>> मध्यरात्री २ वाजता रोहित पवारांच्या कंपनीवर मोठी कारवाई, दोन नेत्यांवर आरोप करत म्हणाले…

गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर भारताच्या नव्या संसद भवनामध्ये ऐतिहासिक निर्णय घेण्यात आले. महिलांना लोकसभा विधानसभेत आरक्षण, याशिवाय जी ट्वेंटी परिषद आणि तेरा कोटीची महत्त्वकांक्षी विश्वकर्मा योजना यामुळे भारताने देशातील विविध विकास योजनांना वेगळी गती दिली आहे . विश्वशांतीच्या दृष्टीने आणि विश्वकल्याणाच्या दृष्टीने भारत हे एक प्रमुख केंद्र असल्याची जाणीव या परिषदेच्या निमित्ताने जगभर आणि देशभर निर्माण झाली . साताऱ्यामध्ये संघटन मजबूत असून येथे उत्तम पद्धतीने काम सुरू आहे.

अद्याप वरिष्ठ कार्यकारिणीची बैठक झालेली नाही. त्यामुळे साताऱ्यात कोण याचा  बैठकीच्या माध्यमातून योग्य व्यक्तींचे निर्णय होतील, त्यावेळी ही नावे जाहीर केली जातील .पुसेसावळी दंगल आणि घडलेली घटना अत्यंत निंदनीय आहे. या संदर्भात पोलीस अधिक तपास करत आहेत .या प्रकरणातील काही जणांना अटकही करण्यात आली आहे .पोलिसांकडून हे प्रकरण योग्य पद्धतीने हाताळले जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मराठा आणि धनगर आरक्षणाच्या संदर्भातही  घटनात्मक तरतुदी तपासून चिकित्सा समितीकडे याची चर्चा सुरू आहे. योग्य वेळी या दोन्ही आरक्षणाबाबत  निर्णय घेतला जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला . पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने उदयनराजें विषयी विचारलेल्या प्रश्नांवर म्हणाले,ते काही भाजपाचे कार्यक्रम नव्हते.कोणी व्यक्तिगत कार्यक्रमात काय करते याचा पक्षाशी काही संबध  येत नाही असे सांगत उदयनराजेंची बाजू खंबीर पणे घेत विषयाला बगल दिली.मात्र या प्रश्नांमुळे पत्रकार परिषदेतील वातावरण गरम झाल्याचे दिसून आले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Union minister kumar mishra in satara for bjp contact campaign remark on ajit pawar zws
Show comments