रत्नागिरी:गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे थोरले चिरंजीव निलेश यांना पत्करावा लागलेल्या पराभवाचा पराभवाची मंगळवारी राणे यांनी विजय मिळवत परतफेड केली.

उद्धव ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी मागील २०१४ व १९ या लागोपाठ दोन लोकसभा निवडणुकांमध्ये राणे यांचे थोरले चिरंजीव निलेश यांचा पराभव केला. त्यापैकी गेल्या निवडणुकीत तर राऊत यांचे मताधिक्य पावणेदोन लाखांपेक्षा जास्त होते. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महायुतीतर्फे भाजपाच्या पक्षश्रेष्ठींनी अनपेक्षित पणे नारायण राणे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. ही खेळी यशस्वी होऊन दीर्घ काळानंतर प्रथमच कोकणात भाजपचा उमेदवार विजय झाला आहे. मंगळवारी झालेल्या मतमोजणीमध्ये राणे यांनी मावळते खासदार राऊत यांचा सुमारे ४८ हजार मतांनी पराभव केला. २५ फेऱ्यांपर्यंत रंगलेल्या या लढतीमध्ये राऊत यांनी पहिला दोन फेऱ्यांमध्ये किरकोळ आघाडी घेतली. मात्र तिसऱ्या फेरीनंतर राणे यांनी ती मोडून काढली. त्यानंतर प्रत्येक फेरीगणिक त्यांचे मताधिक्य वाढतच राहिले आणि अखेरीस विजयाची माळ त्यांच्या गळ्यात पडली. योगायोगाची बाब म्हणजे, यापूर्वी २००९ च्या लोकसभा निवडणुकीत राणे यांचे थोरले चिरंजीव निलेश हेही सुमारे ४७ हजार मतांनी विजयी झाले होते.

process of regularizing project affected constructions gained momentum after return of mahayuti government
गरजेपोटी बांधकामांच्या नियमितीकरण प्रक्रियेला वेग; तांत्रिक मूल्यमापनाचे काम अंतिम टप्प्यात
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
issue of ministery post between Devendra Fadnavis Eknath Shinde and Ajit Pawar is likely to be resolved in Delhi
खातेवाटपाचा पेच आता दिल्लीतच सुटण्याची शक्यता
Thane Water pipe connection, Thane arrears Water connection, Thane Water, Thane latest news, Thane marathi news,
ठाण्यात थकाबाकीदारांच्या १७८० नळजोडण्या खंडीत, ठाणे महापालिकेची कारवाई
s and p global ratings
अर्थव्यवस्थेची घोडदौड कायम राहणार – एसअँडपी; नवीन वर्षात मध्यवर्ती बँकेकडून व्याजदर दिलासा शक्य
centre attempts to revive farm reforms unveils draft policy
शेतीमालाच्या विक्री धोरणाबाबत केंद्राची पुन्हा घाई; सूचना, हरकतींसाठी वेळ वाढवून देण्याची मागणी
Sugarcane Cultivation Kolhapur , Sugarcane ,
लोकशिवार… मुरमाड जमिनीतील उसाची दमदार लागवड
sunk deposits loksatta news
विश्लेषण : बुडालेल्या ठेवी परत मिळू शकतात? शासनाचे नवे परिपत्रक काय?

हेही वाचा >>>धाराशिव : ओमराजे निंबाळकर विक्रमी तीन लाख मतांनी विजयी, महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्य असल्याचा दावा

रायगडचा गड तटकरेंनी राखला…

●रायगड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे पुन्हा एकदा विजयी झाले. शिवसेना उबाठा गटाच्या अनंत गीते यांचा त्यांनी ८२ हजार ७८४ मतांनी पराभव केला.

●सुनील तटकरे यांना ५ लाख ८ हजार ३५२ मतं मिळाली. तर अनंत गीते यांना ४ लाख २५ हजार ६६८ मते मिळाली. तब्बल २७ हजार २७० जणांनी नोटा चे बटन दाबले. अलिबाग, पेण, महाड आणि श्रीवर्धन या चार विधानसभा मतदारसंघात सुनील तटकरे यांना मताधिक्य मिळाले. तर दापोली आणि गुहागर या रत्नागिरी जिल्ह्यातील दोन मतदारसंघात अनंत गिते आघाडीवर राहीले.

तटकरे यांचे मतधिक्य वाढले

या मतदारसंघात १३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. परंतु खरी लढत सुनील तटकरे आणि अनंत गीते यांच्यात होती. ही लढत चुरशीची होणार असा अंदाज व्यक्त केला जात होता. परंतु तसे झाले नाही. सुनील तटकरे यांनी सहज विजय मिळवला. तोही २०१९ च्या निवडणुकीपेक्षा जास्त मतांनी विजय मिळवला.

तटकरेंना ५० टक्के मते

या मतदारसंघासाठी ७ मे रोजी मतदान झाले होते. यात १० लाख ९ हजार ५६३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. यापैकी ५०.१७ टक्के मते सुनील तटकरे यांना मिळाली. तर अनंत गीते यांच्या पारड्यात ४३ टक्के मतं पडली.

Story img Loader