आधी आपलं घर सांभाळावं, मग पक्षासाठी आणि देशासाठी वेळ द्यावा, असा सल्ला भाजपाच्या कार्यकर्त्यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिला आहे. नागपूर येथील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या जुन्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांचे कान टोचले आहेत.

यावेळी बोलताना गडकरी म्हणाले की, ‘ भाजपाठी, देशासाठी आपलं आयुष्य देण्यास तयार असणारे खूप लोक भेटत असतात. त्यांनी आधी आपलं घर सांभाळावं, मग पक्षासाठी, देशासाठी वेळ द्यावा. जो आपलं स्वतःचे घर, मुलं कुटुंब सांभाळू शकत नाही तो देश सांभाळू शकत नाही, असे परखड मत गडकरी यांनी व्यक्त केले आहे.

नागपूर येथे काल शनिवारी अभाविपच्या जुन्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी पक्षाचं काम करण्यास उत्सुक असणाऱ्या कार्यकर्त्यांचे गडकरींनी कान टोचले.

Story img Loader