वाई: पुणे  बंगळूर महामार्गावर  केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या  ताफ्यातील वाहनांना झालेल्या  अपघातात त्यांच्या वाहनाचे मोठे नुकसान झाले. आठवले यांच्या पत्नी किरकोळ जखमी झाल्या. या अपघातात पोलीस वाहनांसह सात गाड्यां एकमेकांवर आदळून  गाड्यांचे मोठे नुकसान झाले .मात्र कोणतीही जीवितहानी झाली नाही.

हेही वाचा >>> गर्दीच्या प्रतिक्षेत मिरजेतील ठाकरे शिवसेनेच्या मेळाव्याचे वेळ पुढे ढकलली

Two youths attacked with a koyta in Khadki crime news Pune news
पुणे: खडकीत दोघा तरुणांवर कोयत्याने वार
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
BJP workers request party seniors that Abdul Sattar should not be minister again
काहीही करा पण मंत्रीपदी सत्तार नको, भाजप कार्यकर्त्यांचे साकडे
seven killed 43 injured in kurla bus accident
कुर्ला बस अपघातात ४३ जखमी, सात जणांचा मृत्यू; भाभा रुग्णालयात ३८, तर शीव रुग्णालयात ७ जणांवर उपचार
Satish wagh murder case, Pune police,
सतीश वाघ हत्या प्रकरण : आरोपींच्या शोधासाठी पुणे पोलिसांची १६ पथके रवाना
Kurla Best bus accident, Sanjay More ,
Kurla Bus Accident : कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणी चालक संजय मोरेला अटक
drunk driver injures woman police officer at checkpost
नाकाबंदीत मोटारचालकाने महिला पोलीस हवालदाराला फरफटत नेले
Vasai-Virar City Municipal Corporation
प्रभारी आयुक्त रमेश मनाळे यांची समाजमाध्यमावर बदनामी

महाड येथील चवदार तळ्याच्या कार्यक्रमासाठी बुधवारी केंद्रीय मंत्री आठवले महाडला आले होते. महाड येथे मुक्काम करून ते आज सकाळी महाबळेश्वर येथे आले. येथून वाई येथे अशोक गायकवाड यांच्या घरी थांबून  मुंबईकडे जात असताना हा अपघात झाला.    पुणे बंगळूर महामार्गावर  वेळे गावच्या हद्दीत सायंकाळी खंबाटकी बोगद्यात प्रवेश करण्यापूर्वी भरधाव वेगातील वाहने एकमेकांवर आदळली. या यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले या मार्गावरून प्रवास करत होते. त्यांच्या ताफ्यात वाहनाच्या पुढे व मागे पोलीस गाडी होती. त्यांच्या ताफ्याच्या पुढील गाड्या एकमेकांवर आदळल्याने त्यांच्या ताफाही त्या गाड्यांवर जाऊन आदळला .रामदास आठवले यांची गाडी पुढील पोलीस वाहनावर जाऊन आदळली. त्यामुळे आठवले यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले. अचानक झालेल्या या अपघातात आठवले यांच्या पत्नी सीमा यांच्या नाकाला किरकोळ दुखापत झाली. ही माहिती मिळताच सातारा जिल्हा  रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष अशोक गायकवाड तात्काळ तेथे पोहोचले. त्यानंतर आठवले गायकवाड यांच्या गाडीने  मुंबईकडे रवाना झाले.  या घटनेची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात झाली आहे.

Story img Loader