सांगली : कर्नाटक सीमेवर असलेल्या जत तालुक्यातील तीन रस्ते कामांना केंद्रिय निधीतून २५ कोटींचा निधी केंद्रिय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मंजूर केला आहे अशी माहिती केंद्रिंय रस्ते वाहतूक सुरक्षा समितीचे सदस्य तथा भाजपचे निवडणूक प्रमुख तमणगोंडा रवि पाटील यांनी बुधवारी दिली.
रस्ते वाहतूक सुरक्षा समितीची बैठक नवी दिल्ली येथे केंद्रिय मंत्री गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.याबैठकीनंतर श्री रविपाटील यांनी जत तालुक्यातील आठ रस्ते कामासाठी केंदिय निधीतून मान्यता मिळावी अशी मागणी केली. यासाठी ६८ कोटी ५० लाख रूपयांची गरज आहे असे सांगितले. केंद्रिय मंत्री गडकरी यांनी यापैकी तीन कामांना मंंजुरी देण्याचे मान्य केले असून यामध्ये एक राज्य तर दोन जिल्हा मार्ग आहेत. यासाठी २५ कोटींचा निधी लागणार असल्याचे श्री. रविपाटील यांनी सांगितले.