सावंतवाडी: देवगड हापूसच्या नावाखाली होणाऱ्या बोगस आंबा विक्रीला पायबंद घालण्यासाठी आता युनिक कोडचा पर्याय समोर येत आहे. त्यासाठी देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार अँड अजित गोगटे यांनी पुढाकार घेतला आहे.देवगडचा जगप्रसिद्ध हापूस आंबा हा सगळ्यांनाच माहित आहे. त्याचबरोबर या आंब्याची ख्याती असल्याने त्याला मार्केटमध्ये मोठी मागणी आहे. देवगड हापूस आंब्याच्या उत्तम गुणवत्तेमुळे बाजारात त्याला जास्त भाव मिळतो आणि याच गोष्टीचा गैरफायदा अनेक व्यापारी घेत असतात. याच्या नुकसानीचा आर्थिक फटका देवगड मधील आंबा शेतकऱ्याला बसत असतो. आंबा बागेची मशागत करण्यासाठी शेतकऱ्याला प्रचंड खर्च येत असतो.

अनेक संकटांवर मात करत शेतकरी आपला हापुस आंबा बाजारपेठेत विक्री करत असतो.देवगड हापूस आंबा विक्री करताना आता जे महत्त्वाचे संकट आहे ते म्हणजे इतर भागातील, राज्यातील आंबा हा देवगड हापूस च्या नावाखाली मुंबई, पुणे, सांगली व अन्य भागातही मोठ्या प्रमाणावर विक्री केला जातो. देवगड मध्ये होणाऱ्या एकूण आंबा उत्पादनाच्या कितीतरी पटीने देवगड हापूस आंब्याची बोगस विक्री बाजारपेठेत होत असते. मग हा आंबा येतो कुठून तर कर्नाटक, बेंगलोर, गुजरात व अन्य सीमावर्ती भागातून येतो. याला बंद करण्यासाठी देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेने अनेक वर्षे झगडून जीआय मानांकन प्राप्त केले आणि जीआय मानांकन धारक शेतकऱ्यांची संख्या वाढविण्याचे प्रयत्न चालू आहेत. परंतु नुसते जीआय मानांकन घेऊन हा प्रश्न सुटणार नाही. त्यासाठी त्याची अंमलबजावणी करण्यासाठी किंवा त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी शासकीय व अन्य यंत्रणा कार्यरत नाही. त्या कार्यरत झाल्या पाहिजेत अशी मागणी आहे.

Suresh Dhas Statement on Prajkata Mali
Suresh Dhas Vs Prajakta Mali : “प्राजक्ताताई माळींसह मी सर्व स्त्रियांचा आदर करतो, त्यांची मनं दुखावली..”, सुरेश धस यांची अखेर दिलगिरी
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
Farmers worship Goddess Mhasoba and Lakshmi along with the five Pandavas at Dharashiv
शेतशिवारात वेळा अमावस्या साजरी; बळीराजाकडून पाच पांडवांसह, म्हसोबा व लक्ष्मीचे पूजन
Kamal Haasan said Sarika would be upset if he offered her money
“मला ती आवडली होती, पण..”, कमल हासन यांनी सारिकाबद्दल केलेलं वक्तव्य; म्हणालेले, “तिला खूप अपमानास्पद…”
Sadabhau Khot
Sadabhau Khot : “देवाच्या काठीला आवाज नाही, तसंच देवाभाऊच्या काठीलाही आवाज नाही”, सदाभाऊ खोत नेमकं काय म्हणाले?
shalini passi marriage story
शालिनी पासीने २० व्या वर्षी केलं लग्न अन् २१ व्या वर्षी झाली आई; पतीसमोर ठेवली होती ‘ही’ अट, म्हणाली…
sai tamhankar arrange diwali pahat for loved ones
मुंबईत ४५ व्या मजल्यावर आहे सईचं आलिशान घर! लेकीच्या घरी आली लाडकी आई; ‘द इलेव्हन्थ प्लेस’मध्ये रंगली दिवाळी पहाट
What Suresh Dhas Said About Prajakta Mali?
Suresh Dhas : प्राजक्ता माळीबाबत प्रश्न विचारताच सुरेश धस म्हणाले, “जे काही…”

हेही वाचा >>>“माझ्या वडिलांना न्याय द्या,” वैभवी देशमुखचे भावनिक आवाहन; सिंदखेडराजात महानिषेध मोर्चा

यासाठी आंबा सहकारी संस्थेने देवगड हापूस नावाने विकल्या जाणाऱ्या प्रत्येक आंब्यावर यूआयडी प्रमाणे एक युनिक कोड असणारा स्टिकर लावण्याची सिस्टम डेव्हलप केलेली आहे आणि या पद्धतीचे पेटंटही घेऊन त्याची अंमलबजावणी करण्याचे ठरविले आहे.  तो युनिक कोड वापरणे देवगड हापूस नावाने विक्री करणाऱ्यांना बंधनकारक असेल. यामुळे ज्या आंब्यावर युनिक कोड असणारा स्टिकर असेल तोच आंबा देवगड हापूस असेल अशी ग्राहकाला ओळख होईल. ज्या आंब्यावर युनिक कोड असणारा स्टिकर नसेल तो आंबा देवगड हापूस असल्याची खात्री ग्राहकाला मिळणार नाही. त्यामुळे आपोआपच ग्राहक युनिक कोड असणाऱ्या देवगड हापूस च्या खरेदीकडे वळेल व खात्री असल्याने जास्तीचा भावही देईल, अशी भूमिका संस्थेचे अध्यक्ष अँड अजित गोगटे यांनी मांडली आहे.

या युनिक कोड स्टीकर चा वापर शेतकऱ्यांनी केल्यास, देवगड हापूसच्या नावाखाली अन्य भागातील जो आंबा विक्री केला जातो आणि पर्यायने देवगड हापूसला कमी भाव मिळतो त्याला कुठेतरी आळा बसेल. आणि भविष्यात हळूहळू देवगड हापूसची एक स्वतंत्र उत्तम अर्थव्यवस्था डेव्हलप होईल.म्हणूनच या पेटंटची, त्याच्या अंमलबजावणीची व त्यापासून मिळणाऱ्या फायद्यांची माहिती सर्व बागायतदार शेतकरी विक्रेत्यांना देण्याकरीता व त्याबाबत चर्चा करण्याकरता दि. २ जानेवारी रोजी, सकाळी १० वाजता, मोरेश्वर जनार्दन गोगटे सांस्कृतिक भवन जामसंडे, येथे चर्चासत्र आयोजित करण्यात आलेले आहे. असे  देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार अँड अजित गोगटे यांनी म्हटले आहे.

Story img Loader