लोकसत्ता वार्ताहर
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
अकोले : बीजमाता राहीबाई पोपरे यांनी गावरान बियांचा वापर करून राख्या बनविल्या आहेत.उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील व अन्य मानलेल्या भावांसाठी त्यांनी या राख्या तयार केल्या आहेत. गावरान बियाणांचे जतन व संवर्धनाचे मोठे काम राहीबाई पोपरे यांनी केले आहे. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे.
कोंभाळणे या आदिवासी खेड्यात असणाऱ्या त्यांच्या बीजबँकेसाठी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोठी मदत केली आहे. राहीबाई चंद्रकांत दादांना आपला भाऊ मानतात. आपल्या या भावासाठी राहीबाई यांनी भात, नागली, वरई, काकडी, भोपळा, तूर, मूग, उडीद, वाल, काकडी, घोसाळे, डांगर भोपळा या सारख्या अनेक प्रकारच्या गावरान बियांचा वापर करून त्यांनी स्वतःच्या हाताने सुरेख राख्या तयार केल्या आहेत.
आणखी वाचा-Eknath Shinde : “…तर गाठ माझ्याशी आहे”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांना इशारा
राहीबाईंच्या कार्यामुळे अनेक शेतकरी त्यांना आपली बहीण मानतात. आपल्या या भावांसाठी त्यांनी ही बीज राख्यांची विशेष मोहीम राबविली. त्याचप्रमाणे देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या सैनिकांकांसाठी या राख्या भेट म्हणून पाठविल्या आहेत.