राज ठाकरे यांच्या भाषणातील ठळक मुद्दे;
- नवीन महाराष्ट्र घडवण्याची ताकद राज ठाकरेच्या मनगटात आहे.
- आजवर महाराष्ट्रापुढे पर्याय नव्हता पण आता हा राज ठाकरे तुमच्यासमोर पर्याय आहे.
- सुरेशदादा जैन यांनी विधानपरिषदेसाठी ९५ कोटी खर्च केल्याचा राज ठाकरेंचा आरोप.
- राज ठाकरेंनी केली सुरेशदादा जैन यांची नक्कल.
- सर्वच बाबतीत भ्रष्टाचार सुरू असताना कोणकोणत्या विषयावर बोलायचं.
- समोरच्या वाईट माणसाला हाणण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचीच काठी उपयोगी पडेल.
- दुष्काळामुळे महाराष्ट्रातील मुली वेश्याव्यवसायात फेकल्या गेल्या आहेत.
- राज ठाकरेंची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीका.
- अजित पवार, याच्यापुढे तुम्हाला महाराष्ट्रातून मत नाही मुत मिळेल.
- मुंब्य्रातील इमारत अपघातात दगावलेले ८० टक्के मुलसमान आणि २० टक्के हिंदू मात्र सर्वजण उत्तर प्रदेशातील.
- मुंब्य्रातील अपघातग्रस्त इमारत बांधणारे उत्तर प्रदेशातील.
- आमचे राजे बेसावध आहेत.
- आमचा ‘राजा’ जोपर्यंत जन्माला येत नव्हता तोपर्यंत आम्ही पारतंत्र्यात होतो.
- जो इतिहास विसरतो त्याला इतिहास विसरतो.
- राज कारण मोडून काढावं लागेल.
- महाराष्ट्रात सगळीकडे सारखेच प्रश्न असल्यामुळे आपण एकसंघ महाराष्ट्र पाहिला पाहिजे.
- संपूर्ण महाराष्ट्र हा माझा मतदारसंघ आहे.
- मी एकसंघ महाराष्ट्र बघतो.
- संयुक्त महाराष्ट्र आज ‘विभक्त महाराष्ट्र’ झाला आहे.
- महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांनी जातीच्या नावावर महापुरूषांचं विभाजन केलं.
- आर.आर.पाटील यांनी आरक्षणाच्या मुद्यापेक्षा मराठी तरूणांच्या रोजगाराच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला हवे.
- महाराष्ट्रातील जनतेला राज्यकर्त्यांनी गृहीत धरलेलं आहे.
- महाराष्ट्रातील प्रत्येक राजकारणी मनाने हरलेला आहे.
- महाराष्ट्रातल्या प्रश्नांबद्दल सर्वपक्षीय एका व्यासपीठावर येत नाहीत, तर फक्त आरक्षणासाठी येतात.
- मी देशाला मानतो पण पहिल्याप्रथम मी मराठी माणूस आहे.
- महाराष्ट्रात येणा-या उद्योगधंद्यांमध्ये मराठी माणसांनाच प्राधान्य मिळालं पाहिजे.
- आम्ही मराठी माणसांबदद्ल बोलतो, त्यामुळे राज्य सरकार आमच्यावरच केसेसे टाकते.
- मी मत मागायला नाही तर मत मांडायला आलोय.
- कुठल्याही पक्षाच्या नेत्यासोबत माझे वैयक्तीक मतभेद नाहीत, पण चुकीच्या गोष्टींबद्दल मी बोलणारच.
- राज ठाकरेला विकत घेणारा अजून जन्माला यायचाय.
- दौ-यात मला कुणाला व्यवस्थित वेळ देता आला नसेल तर त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो.
- पोतडीत भरपूर विषय आहेत, हळूहळू बाहेर काढणार.
- राज ठाकरेंच्या राज्यव्यापी दौ-याची आज जळगावमध्ये सांगता.
आणखी वाचा